जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढू लागल्याचे सोमवारी समोर आले. शहरातील 11 जणांसह तालुक्यात सतरा जणाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहेत.
जत शहरातील एका व्यापाऱ्यांच्या संपर्कातील आठ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर बेळगाव येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील विठ्ठलनगरचे दोघे,तर मयत तरूणांच्या संपर्कातील आंबेडकर नगरमधील एक जण असे जत शहरातील 11 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
तर पाच्छापूर येथील बाधित डॉक्टरांच्या संपर्कातील सहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.दरम्यान रवीवारी रात्री उशिराने खैराव येथील एक जणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.जत यामुळे जत तालुक्यातील बाधिताची संख्या 174 पोहचली आहे.जत शहरासह तालुक्यातील वेगवेगळ्या बाधिताच्या संपर्कातील सुमारे 93 जणांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.त्यापैंकी सोमवारी 45 जणांचे अहवाल तालुका आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत.त्यापैंकी 28 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तर अद्याप 48 जणांचे तपासणी अहवाल प्रंलबित आहेत.शहरात कोरोनाचा प्रभाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे.आरोग्य विभागाची पथके सक्रीय करण्यात आली आहेत. बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्याचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात येत आहेत.तर परिसरातील नागरिकांची तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागाकडून गतीने करण्यात येत आहे.शहरासह तालुक्यात कोरोनाची बाधित संख्या नागरिकांची चिंता वाढत आहे.
नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे.
जत शहरासह तालुक्यातील कोरोना बाधित संख्या झपाट्याने वाढत आहे. आम्ही कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी शर्थीचे काम करत आहोत.बाधिताच्या संपर्कातील लोंकाचा शोध घेऊन त्यांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात येत आहे. तालुकाभर आम्हचे डॉक्टर्स,कर्मचारी कोरोना फैलाव रोकण्यासाठी काम करत आहोत.यात नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे,असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी केले.