वाद्य कलाकारांवर उपासमारीची वेळ | आर्थिक मदत देण्याची मागणी

0



जत,प्रतिनिधी : कोरोनामुळे वाद्य कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.विविध क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कलाकारांना सध्या काम नाही. यासाठी सरकारने सरसकट आर्थिक पाच हजार रुपये कलाकारांना मदत करण्यात यावी,यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय होलार समाज संघटना(ए)गट यांचे वतीने जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना संघटेनेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे,जेष्ठ नेते रामभाऊ हेगडे व जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब गेजगे यांनी दिले आहे.





Rate Card

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हास्तरीय कलाकार मानधन समितीमध्ये होलार समाजातील कलाकारांना प्रतिनिधीत्व मिळावे.सर्व कलाकारांना शासनाने कोरोना कालावधीमध्ये सरसकट पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे व वयाची अट रद्द करावी.सर्व कलाकारांना शासनाने जीवनावश्यक वस्तुचे वाटप करावे.कलाकारांनाही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात यावा व तसे बँकाना शासनाने आदेश करावेत.अनेक कलाकार हे कोरोना या आजारावर प्रबोधन जनजागृती करत आहेत त्यांना शासनामार्फत

योग्य मानधन देऊन कार्यक्रम करणेसाठी परवानगी देणेत यावी,या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कुंभारीचे लोकनियुक्त सरपंच राजाराम जावीर, भगवंत जावीर, रखमाजी जावीर, अंकूश जावीर, तुकाराम ऐवळे, कुंडलिक जावीर यांच्या सह होलार समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.