रक्षाबंधनाच्या सणानिमित्त महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी

0जत,प्रतिनिधी : जत शहरात महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभे करून जत नगरपरिषदेने महिला भगिनींच्या सन्मानार्थ रक्षाबंधनाची भेट द्यावी,अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे .  
जत नगरपरिषदेने स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारलेली नाहीत. नगराध्यक्ष व निम्मे लोकप्रतिनिधी महिला असताना एकही महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही हे जतकरांसाठी दुर्दैवच म्हणावे लागेल,जत शहर व तालुका कुटुंब म्हणून निवडणुकीत भाषणबाजी करणाऱ्यांनी निवडणुकीनंतर आपल्या याच कुटुंबातील किमान महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी लज्जा रक्षणाच्या दृष्टीने कृतिशील पाऊल उचलणे गरजेचे होते. 
आता सोने तारण कर्जासाठी बँकेत येणाची गरज नाही,सांगली अर्बन बँकेची हि लिंक बघा


महिलांसाठीच्या स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी अनेक वर्षे आम्ही सातत्याने मांगणी करत आहे. पण अद्याप कार्यवाही झालेली नाही. नगरपरिषद एवढी उदासीन का आहे हे न समजणारे कोडे आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे मागणी केली असून जिल्हाधिकारी यांनी जत नगरपरिषदेला योग्य ते आदेश द्यावेत  असेही ढोणे म्हणाले.Rate Card
जत नरपरिषदेकडे आम्ही वारंवार मागणी करूनही जत याबाबत नगरपरिषदेला गांभीर्य नाही जत नगरपरिषदेकडे स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यासाठी निधी नसेल,तर प्रशासनाने आम्हाला कळवावे आम्ही शहरातील जागृत नागरिकांकडून माता-भगिनीच्या सन्मानासाठी ओवाळणी म्हणून लोकवर्गणी काढून स्वच्छतागृह उभारण्यासाठी निधी गोळा करून देण्यास तयार आहे असे ढोणे म्हणाले.


शहरामध्ये मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापडपेठ , भाजी मार्केट,मटण मार्केट,गांधी चौक परिसरासह अनेक भागांत महिलांसाठी व पुरूषांसाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे बाजारात असणारे छोटे व्यापारी,भाजीविक्रेते,फळविक्रेते, हातगाडीवाले,खरेदी करण्यासाठी येणारे नागरिक, महिलांची अडचण होते. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होत आहे. सार्वजनिक स्तरावर महिलांसाठीची अशी स्वतंत्र सुविधा नाही.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये जत नगरपरिषदेला बक्षीस मिळाले.परंतु जास्त खेदाची बाब म्हणजे प्रमुख रस्ते अथवा महत्वाच्या ठिकाणी एकही महिला व पुरुष स्वच्छतागृह नाही. ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांनाही असुविधेचा सामना करवा लागतो.त्यामुळे या महिलांसाठी एकमेव बसस्थानकातील स्वच्छतागृहांमध्ये जावे लागते. हे  स्वच्छतागृहे शहराच्या एका टोकाला आहे; तर मध्यवर्ती ठिकाणी शहर असून बाजारपेठ तेथून दूर अंतरावरचे स्वच्छतागृह गाठणे तारेवरची कसरत ठरत आहे. शहरामध्ये सार्वजनिक पुरुष स्वच्छतागृहांची संख्या फक्त तीन आहे तेथेही घाणीचे साम्राज्य पसरले आहे.जत तालुक्यात दोघाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह | बालगावमध्ये कोरोनाचा प्रवेश : उटगीतील डॉक्टरांना बाधा |


जत शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसह पुरुषांची मोठ्या प्रमाणावर शहरात वर्दळ असते. विशेषता मंगळवारी,गुरुवार आठवडे बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ जास्त असते.शहरातील नागरी वसाहती व सर्वच प्रमुख रस्त्यांवर नागरीकरण वाढून टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, परंतु शहरात आवश्यक प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. पुरुष मंडळी अशा स्थितीत कोठेही निर्मनुष्य जागा पाहून आडोसा शोधतात. पण महिलांची मात्र कुचंबणा होते.’स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने महिलांच्या व पुरुषांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवतात किमान शहरातील मुख्य बाजारपेठसह प्रत्येक विभागात प्रमुख ठिकाणांच्या परिसरात तरी महिलांसाठी व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे लोकसंख्येच्या प्रमाणात उभारावीत यासाठी जिल्हाधिकारी यांनी जत नगरपरिषदेला योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.