जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाने शनीवारी 30 वर्षीय तरूणांचा बळी घेतला.शहरातील हा तिसरा बळी ठरला.
तालुक्यात नव्याने दोन रुग्ण वाढल्याने कोरोना बाधित संख्या 154 वर पोहचली आहे.जत शहरातील एकजण तर बाजमधील एकजणाचा बाधितमध्ये समावेश आहे.
जत तालुक्यात कोरोनाने पाय पसरले आहेत.शहरासह तालुक्याला अखेर कोरोनाने विळखा घातला आहे.शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत.त्यात शनीवारी कोरोना बाधिताच्या संपर्कातील तरूणाला त्रास होऊ लागल्याने त्यांना सांगली येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.कोरोना बाधित वडीलाच्या संपर्कात आल्याने तो बाधित आढळून आला होता.उपचार सुरू असताना शुक्रवारी मध्यरात्री त्यांचा मुत्यू झाला.आतापर्यत वयोवृद्ध व आजारी रुग्णाला कोरोनाचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र तरूणांचा बळी गेल्याने चिंता वाढली आहेत.हा शहरातील कोरोनाचा तीसरा तर तालुक्यातील सहावा बळी ठरला.
दरम्यान शहरातील एका माजी संरपचाला कोरोनाची बाधा झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत.तर बाज येथील एकजण कोरोना बाधित आढळून आला आहे.
दरम्यान शहरातील रुग्ण वाढू लागल्याने भिती व्यक्त केली जात आहे.शनीवारी नवा रुग्ण आढळून आल्याने शहरात नववा कंन्टेटमेंट झोन तयार झाला असल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठ,रस्ते बंद झाले आहेत.दरम्यान बाधिताच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध सुरू आहे. आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे.