जत बाजारपेठच सील | आणखीन एक रुग्ण वाढला
जत,प्रतिनिधी : जत शहरात गुरूवारी एकाच दिवसात 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने खबरदारी म्हणून जत शहरातील मुख्य बाजारपेठ सील करण्यात आली आहे.
शहरातील पांरधीताडा,आंबेडकर नगर या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.बाजार पेठेला लागून हा भाग येत असल्याने नगरपरिषदेकडून खबरदारी म्हणून शहराची मुख्य मंगळवार बाजार पेठ बनाळी चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यत काटे टाकून बंद केली आहे.

शहरात सकाळच्या बाधित रुग्ण संख्येत संध्याकाळीएकाची भर पडली आहे.आंबेडकर नगरमधील एक चालकांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.दरम्यान जिल्ह्यात पुकारलेला लॉकडाऊन गुरूवार ता.30 ला संध्याकाळी संपला आहे.आजपासून शहर चालू राहणार का नाही याबाबत अद्याप नगरपरिषदेकडून कोणतीही माहिती आलेली नाही.
जत शहरातील प्रमुख बाजारपेठ अशी बंद करण्यात आली आहे.