कोतवालांचे मानधन वाढवून द्या ; सुभाष कोळी

0

जत,प्रतिनिधी : शिपाई पदास पात्र कोतवालांना 40 टक्के कोट्यानुसार कोतवालांना पदोन्नती म्हणून 15 हजार रूपये मानधन देण्यात येत आहे.त्यामुळे उर्वरित पाच वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांना व शिपाई पदास पात्र असलेले कोतवाल आजही पाच हजारांवर काम करत आहेत.अशा प्रात्र सर्व कोतवालांना पदोन्नती मिळेपर्यंत 15 हजार रूपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी जत तालुका कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष कोळी यांनी केली आहे. 




महाराष्ट्र राज्य महसूल व वनविभागाने कोतवालांना पगार वाढी संदर्भात 6 फेब्रुवारी 2019 रोजी आदेश जारी केला असून करून शिपाई  संवर्गात पदोन्नतीसाठी 40 टक्के कोटा वाढविला आहे.

Rate Card






या शासन निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातील कोतवालांना अद्याप लाभ झाला नाही. कोतवालामधून शिपाई पदातील चतुर्थ श्रेणी संवर्गात पदोन्नती करण्यासाठी महसूल परिपत्रकानुसार ज्या कोतवालांची सेवा कालावधी पाच वर्षे पूर्ण व ज्यांचे वय 45 वर्षांच्या आत आहे, अशांना पदोन्नती देण्यात यावी किंवा पदोन्नती मिळेपर्यंत 15 हजार रुपये पगार देण्यात यावे, असे आदेश आहे. त्यामुळे कोतवालांना याचा लाभ द्यावा, अशी मागणी संघटनेचे कोळी यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.