युवक राष्ट्रवादीकडून जत पोलीसांना मास्क,सँनिटायझरचे वाटप
जत,प्रतिनिधी : कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱ्या पोलीसांना राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने एन 95 मास्क व सँनिटायझचे वाटप करण्यात आले.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जत युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण यांनी हा उपक्रम राबविला.
आज कोरोनासारख्या आजाराशी सर्व जगाबरोबर महाराष्ट्र शासनातील सर्व विभाग काम करत आहेत.जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत असताना पोलीस प्रशासनही यात जीव धोक्यात घालून काम करत आहेत.जनतेची रक्षा करणाऱ्या कोरोना योध्दाच्या रक्षणासाठी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस धावले आहे.कोरोनापासून संरक्षण व्हावे म्हणून चांगल्या दर्जाचे एन 95 मास्क व सँनिटायझरचे पोलीसांना वितरण करण्यात आले.
यावेळी प्रशिक्षिणार्थी डीवायएसपी डॉ. निलेश पालवे,उपनिरिक्षक महेश मोहिते,श्री.कांबळे यांच्याकडे युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण यांच्याहस्ते हे मास्क व सँनिटायझर सुपुर्द केले. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना पुरतील एवढे मास्क व सँनिटायझर देण्यात आले आहे.यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी,जत तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सतिश उर्फ पवन कोळी, हेमंत खाडे,जयंत भोसले,योगेश एडके,हेमंत चौगुले,रमजान उर्फ बंटी नदाफ,राहुल बामणे,रुपेश पिसाळ,मयूर माने, अमरसिंह माने पाटील,व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
जत पोलीसांना एन-95 मास्क व सँनिटायझर सुपुर्द करताना उत्तम चव्हाण, अशोक कोळी, हेमंत खाडे आदी