जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ठेकेदार व त्यांना पाठीशी घालून कोट्यावधीची माया गोळा करणारे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डांबराविनाच डांबरीकरण असा नवीन फंडा तालुक्यात सुरू केला आहे. यांचा पर्दापास भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी केला आहे.
तालुक्याच्या दोन्ही टोकाला जोडणाऱ्या जत- उमदी रस्त्याचे नव्याने दुरूस्तीची काम भर पावसात सुरू आहे.या रस्त्याचे काम इतके निकृष्ट होत आहे की,यात डांबराविनाच डांबरीकरण करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार पवार यांनी उजेडात आणला आहे.या रस्ते कामाचा व्हिडिओच त्यांनी सोशल मिडियावर शेअर करत बांधकाम विभागाचे अनेक वर्षापासून जतेत तळ ठोकून असलेले विभागीय अधिकारी श्री.अजयकुमार ठोंबरे व संबधित ठेकेदाराच्या समन्वयाने सुरू असलेला खेळखंडोबा समोर आणत,या बेजबाबदार लोकामुळे शासनाच्या निधीची दिवसाढवळ्या लुट केली जात आहेच,त्याशिवाय असे दर्जाहिन रस्ते करून या रस्त्यावरून जाणाऱ्या लाखो लोंकाच्या शरीराची वाट लावली जात आहेत.यामुळे अनेक नागरिक रस्त्यावरील दणक्याने कायमचे अपंग झाले आहेत.
अंदाजपत्रकानुसार निविदा मंजूर असूनही भेसळयुक्त ऑईल मिश्रित दर्जाहिन काम करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. सध्या ई-निविदा असल्यामुळे ठेकेदारांची खूपच चढाओढ असते, यात मोठी स्पर्धा होणे अपेक्षित होते, मात्र प्रशासकीय संगनमत करून सदर निविदा अंदाजपत्रका नुसार मंजूर करून सोयीच्या ठेकेदारांना मोठी टक्केवारी घेत कामे देण्याचे प्रकार ही जतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बेधडक होत असल्याचे आरोप आहेत.प्रत्येक वर्षी शासनाच्या कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी करून पैसे लुटीची ही साखळी दरवर्षी अशा अनेक रस्त्यावर सातत्याने कामे करताना दिसत आहेत.दर्जाहिन रस्ते तयार करायचे म्हणजे पुन्हा त्याच रस्त्यावर दुरूस्तीसाठी पुन्हा नव्याने खर्च करायाचा व पुन्हा शासनाची लुट करायची असा धंदा या लुटारू टोळीकरून राजरोसपणे सुरू आहे.त्यांच्या एका कृष्ण कृत्याचा प्रदार्पाश भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी केला आहे.असे रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डांबरीकरण की मुरमीकरण
जत ते उमदी रस्त्यावर अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे काम चालू आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी,कंत्राटदार व प्रशासन यांच्यात टक्केवारीचा खेळ सुरू आहे.यामुळेच तालुक्यातील रस्ते कामाचा खेळखंडोबा होत असतानाही जनता मूग गिळून स्वस्थ आहे.पदाधिकारी बेफीकीर आहेत.तालुक्यातील रस्त्याचे भर पावसात डांबरी रस्त्यांची कामे चालू आहेत.अत्यल्प डांबराचा टॅककोट,एमपीएमचे थर व ऑईल मिश्रित डांबर वापरून रस्त्यांची कामे चालू आहेत.जत-उमदी रस्त्याच्या कामाची तक्रार मी फोनवरून जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत,सार्वजनिक बांधकामचे विभागीय अधिकारी ठोंबरे यांचेकडे रविवार दि.26/7/2020 रोजी फोनवरून याबाबत तक्रार केली आहे.पण कामाच्या दर्जामध्ये कसलीही सुधारणा नाही.त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून जत- उमदी रस्त्याच्या नित्कृष्ट कामाच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार आहोत.
सुनिल पवार,तालुकाध्यक्ष,भाजपा