नियम तोडायचा,तरीही आम्हीच श्रेष्ठ | कोरोना काळातही उच्च विद्याविभुषीत काही खाजगी डॉक्टरांचा प्रताप

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य विभाग,स्थानिक प्राथमिक केंद्राचे डॉक्टर्स,कर्मचारी रात्रीचा दिवस करत धोका पत्करून काम करत आहेत.तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत,यासाठी त्यांचा जीवावर बेतणारा संघर्ष करत आहेत.तालुक्यातील अनेक खाजगी डॉक्टरही या काळात जीव धोक्यात घालून कोरोना योध्दा म्हणून काम करत आहेत.मात्र आम्ही फार विद्वान असल्याचा आव आणत काही खाजगी डॉक्टर प्रतिबंधित औषधे वापरत लोकांच्या भावाना,आरोग्य,जीवाशी खेळण्याचा प्रकार राजरोसपणे करत आहेत.पैसे मिळविण्यासाठी कट प्रँक्टिसचा धंदा जोरात सुरू आहे.हॉस्पिटल नियमानुसार सुरु आहेत का हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.रुग्णाची कोणत्याही नोंदी,फाईल ठेवली जात नाही.एकही प्रशिक्षित कर्मचारी नाही,अशा कर्मचाऱ्याकडून सलाईन,इंजेक्शन दिले जातात.नर्सिंग कौंन्सिलचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत.बऱ्याचवेळा दवाखान्यात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते.त्यामुळे हा दवाखाना आहे का केश कर्तनालय आहे,असा प्रश्न पडतो.त्यामुळे आरोग्य विभागाने अशा दवाखान्याचा शोध घेऊन कायमचे टाळे ठोकावेत,अन्यथा असे दवाखाने कोरोना प्रसाराचे केंद्रे बनतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.आरोग्य विभागाने कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी या खाजगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांना ताप,कोरडा खोकला,घसा दुखणे,सर्दी सारखे हायर लक्षणे दिसत असल्यास त्यांना शासकीय दवाखान्यात पाठवावे,असे सक्त आदेश देण्यात आले आहेत.तरीही स्व:ता आम्ही फार विद्या विभूषित असल्याचा आव आणणाऱ्या काही डॉक्टर अशा रुग्णावर बेधडक उपचार करत कोरोनाचा धोका मानगुटीवर आणत आहेत. शासन,आरोग्य यंत्रणा एकीकडे रात्रीचा दिवस करत असताना दुसरीकडे असे काही डॉक्टर त्याला तिलांजली वाहत आहेत.अनावधाने अशा एकाद्या दवाखान्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आला तर,त्यांची बदनामी होत असल्याचा कांगावा त्यांच्याकडून केला जात आहे.अशा डॉक्टरांचे विद्वान नातेवाईकांना अशा बेजबाबदार पणाला पाठिशी घालत बदनामी झाल्याचा साक्षात्कार होत आहे.

मुळात काही खाजगी डॉक्टरांना रुग्णालयात साधी रुग्ण नोंद ठेवायला लाज वाटते.यापेक्षा वाईट काही असेल यांचा विचार जनता करेलचं. मात्र अशा विद्वान लोकांना आपल्याकडे विश्वासाने येणाऱ्या लोंकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार बंद करावा अशी मागणी होत आहे.स्टेरॉईडचा वापराने रुग्ण बरा करण्याचा नवा फंडा


Rate Card

जत तालुक्यातील एका गावात एका रुग्णालयात उपचार केलेला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता.त्यानंतर या दवाखान्याची तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली.त्यात अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत.या खाजगी दवाखान्यात येणाऱ्या कोणत्याही रुग्णाची नोंदच नसल्याचे स्पष्ट झाले.त्यापेक्षा वाईट म्हणजे कोरोना झालेल्या या रुग्णावर थेट स्टेरॉईडचा (एमडी डॉक्टरांना देणे शक्य नसलेला) हाय डोस दिल्याचे समोर आले आहे. या बेजबाबदार खाजगी डॉक्टरांवर कारवाई होणार हे निश्चित आहे.संबधित शासकीय यंत्रणेकडून तसा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

कोरोनाचा फलक लावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना हाकलून लावले


ग्रामीण भागातील एका विद्वान डॉक्टरांने कोरोनाचा फैलाव रोकण्यासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणेकडून लोकांच्यात कोरोनाची जागृत्ती करण्यासाठीचे फलक त्यांच्या दवाखान्यासमोर लावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना हाकलून लावले होते. त्यामुळे हा डॉक्टर कोरोना बाबत किती गंभीर आहे हे स्पष्ट आहे.या कर्मचाऱ्यांनीही त्याबाबत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
खाजगी दवाखान्यावर नियत्रंण कुणाचे
जत तालुक्यातील पश्चिम भागात बोगस डॉक्टरांसह खाजगी डॉक्टर कोरोना बाबत बेफीकीर असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे.मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर पश्चिम भागात बेधडक उपचार करत आहेत.त्याबाबत आम्ही अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत.अशा बेजबाबदार डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.


दिग्विजय चव्हाणपंचायत सदस्य,जत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.