डफळापूर महामार्गाचे वगळलेले काम अखेर सुरू

0

डफळापूर,वार्ताहर : नरसिंहगाव ते जत सुरू असलेल्या रस्ते कामात वगळलेल्या डफळापूर गायकवाड बसस्टॉप ते शहीद शंकर पेट्रोल पंपापर्यतचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.नेमके डफळापूर गाव भागातील रस्ता वगळल्याने उपसंरपच प्रताप चव्हाण,भाजपचे नेते परशूराम चव्हाण सर यांनी वगळलेल्या कामाला आक्षेप घेत वगळलेल्या काम केल्याशिवाय पुढे काम करू देणार नाही,असा पवित्रा घेतला होता.
पुढे सुरू असलेले काम थांबविले होते.अखेर संबधित ठेकेदार कंपनी व राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कोल्हापूरचे अधिकारी यांनी चर्चा करत डफळापूर स्टँडसमोरून जाणाऱ्या चारशे मीटरच्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.या चारशे मीटर रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे पडले होते.पुढे काही महिन्यात रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडण्याची शक्यता होती.त्या अनुषंगाने हे काम वगळू नये यासाठी आम्ही मागणी केली होती. वरिष्ठ अधिकारी,ठेकेदार कंपनीकडून आम्हच्या मागणीनुसार अखेर हे सुरू केले आहे.त्यामुळे डफळापूर गाव भागातून जाणारा रस्ताही आता मजबूत होणार आहे,असे परशुराम चव्हाण सर यांनी सांगितले.

Rate Cardडफळापूर गाव भागातील महामार्गाचे वगळलेले काम अखेर सुरू करण्यात आले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.