जत,प्रतिनिधी : सध्या कोरोना प्रभाव वाढत असतानाही जत मधील राष्ट्रीयकृत बँकेसमोर खातेदारांची गर्दी वाढत असून सोशल डिस्टन्स पाळले जात नाही व तोंडाला मास्क अजिबात लावत नाहीत, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे,असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी केले आहे.
सध्या बँकेत शासनाच्या विविध अनुदानचे पैसे जमा होत असून त्यामुळे गर्दी वाढत असल्याने ते आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आपला एक माणूस किंवा पोलिस कॉन्स्टेबल, होमगार्ड उभे करून सोशल डिस्टन्सचे नियम लावणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोकता येईल.त्याशिवाय बँकेतील कामकाज अतिशय मंद गतीने होत असून गर्दी लक्षात घेऊन कामाला गती देणे गरजेचे आहे. त्यासोबत लोकांनी स्व:ताच संरक्षण स्वतः करणे महत्वाचे आहे. कोरोना हे संसर्गजन्य रोग असल्याने अतिभयंकर महामारीपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्स व तोंडाला मास्क लावून स्वतःची काळजी घ्यावी,असेही दिनकर पतंगे सांगितले.