डफळापूरच्या खाजगी डॉक्टरांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह
डफळापूर,वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील खाजगी डॉक्टरांचा व त्यांच्या कंपाऊडरचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैैद्यकीय डॉ.अभीजीत चौथे यांनी दिली.
अंकले येथील कोरोना बाधित रुग्णावर या डॉक्टरांनी उपचार केल्याने,त्यांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.यामुळे डफळापूरात भितीचे वातावरण पसरले होते.

त्यातच बाजमधील अंकलेच्या बाधित रुग्णावर उपचार केलेला बोगस डॉक्टर बाधित आल्याने व डफळापूरच्या खाजगी डॉक्टरांचे अहवाल रखडल्याने उलटसुलट चर्चा सुरू होती.मात्र रवीवारी सायकांळी या खाजगी डॉक्टरासह त्यांच्या कंपाऊडरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने डफळापूरकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.दरम्यान अंकले रुग्णाच्या संपर्कात अन्य कोण आले आहे का यांचा तपास आरोग्य यंत्रणेकडून सुरू आहे.