कोरोना बाधित बोगस डॉक्टरांच्या संपर्कातील 24 जण क्वोरोंटाईन

डफळापूर,वार्ताहर : बाजमधील बोगस डॉक्टरच्या जवळच्या संपर्कातील 12 जणांना संस्था क्वोरोंटाईन तर लांबच्या संपर्कातील 12 जणांना होम क्वोरोंटाईन करण्यात आले आहे.
अंकले येथील कोरोना बाधित रुग्णावर बाज येथील बोगस डॉक्टरांने उपचार केला होता.सलाईन,औषधउपचार यामुळे बाधिताशी या डॉक्टर व त्यांचा कंपाऊडचा जवळचा संपर्क आल्याने त्याचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.त्यापैंकी बाधित रुग्णावर उपचार केलेल्या या बोगस डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले आहे.त्यांने उपचार केलेले व त्यांच्या संपर्कातील 24 जणांना क्वोरोंटाईन करण्यात आले आहे. त्यातील जवळच्या संपर्कातील बारा जणांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत.
बाजमधील या डॉक्टराकडे कोणत्याही पदव्या नसतानाही तो बेधडक रुग्णावर उपचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे कोरोना काळात खाजगी रुग्णालयांना दिलेले आदेश या बोगस डॉक्टरांने मोडल्याचे निश्चित झाले आहेत.त्यामुळे या बोगस डॉक्टरावर कडक कारवाई केली जाणार आहे.त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविणार असल्याने डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकरी डॉ.अभिजीत चौथे यांनी सांगितले.