साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेना भारतरत्न द्या | आ.विक्रमसिंह सांवत यांचे शासनाकडे निवेदन

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळणे करिता ठराव घेऊन प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा अशी मागणी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी महाराष्ट्र सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रातील साहित्य श्रेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे साहित्यसम्राट

अण्णाभाऊ साठे यांचे आहे.अण्णाभाऊ साठे यांचे 2020 हे जन्म शताब्दी वर्ष आहे.अण्णाभाऊ साठे यांचे

साहित्य श्रेत्रातील नाव व कार्य पाहता महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न पुरस्काराची शिफारस होणे आवश्यक

आहे.याकरिता विधानसभा व विधान परिषद या सभागृहात ठराव होणे महत्वाचे आहे.परंतु कोरोना विषाणूचा

प्रादुर्भावामुळे हे शक्य नाही.म्हणून शासनाने हा प्रस्ताव तयार करणे आवश्यक आहे.

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी यावर्षी शासनाने प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवावा,अशी मागणी माझ्या मतदार संघातून होत आहे.तरी शासनाने त्वरित अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भातील भारतरत्न पुरस्कारा साठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा असे निवेदनात आ.सांवत यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.