आटपाडी ठाण्यातील उपनिरिक्षकाला कोरोनाची लागण
आटपाडी : सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.नुकत्याच कोरोना चाचणी अहवाल उपनिरीक्षकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

यापुर्वी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती.या तीघाच्या संपर्कातील अधिकारी,कर्मचाऱ्यांचे स्बाव तपासणीसाठी घेण्यात आले होते.त्यामध्ये आज आलेल्या अहवालामध्ये सदर पोलीस उपनिरीक्षकास कोरोनाची लागण झाली आहे.कोरोना काळात योद्धे म्हणून काम करणाऱ्या पोलीस कोरोना बाधित होऊ लागल्याने चिंता वाढली आहे.