येळवीत आरोग्य सेविकेस मारहाण

जत,प्रतिनिधी : येळवी ता.जत येथील आरोग्य सेविकेला शिवीगाळ,मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून धनाजी घोंगडे,म्हाळू घोंगडे यांच्या विरोधात आरोग्य सेविका सुरेखा विभूते यांच्या फिर्यादीवरून जत पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,आरोग्य सेविका सुरेखा विभूते या गावातील विभूते यांच्या घरी कोरोना संदर्भातील माहिती देण्यासाठी गेल्या होत्या.दरम्यान घोंगडे यांनी ,तु आमच्या आईचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे, असे का सांगितलेस म्हणून चाबुक,हाताने मारहाण केली,असे विभूते यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.शासकीय कामात अडथळा,मारहाण याप्रकरणी पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.