डफळापूरच्या खाजगी डॉक्टरांचा रिपोर्ट रखडला,उलट-सुलट चर्चेला उधान | भितीचे वातावरण कायम
डफळापूर, वार्ताहर : अंकले ता.जत येथील कोरोना बाधित रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा व त्यांच्या कपाऊंडरचा स्वाबचा तपासणी रिपोर्ट अद्याप आले,नसल्याने डफळापूरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
अंकलेतील बाधिताच्या संपर्कातील डफळापूरच्या खाजगी डॉक्टरांसह बाजचा बोगस डॉक्टर,त्यांचे कंपाऊडर,बाधिताच्या घरातील लोंकासह 12 जणांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले होते.

त्यातील बाधिताची आई,बाजचा बोगस डॉक्टर यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर डफळापूर येथील खाजगी डॉक्टर, व त्यांचा कंपाऊडर वगळता अन्य जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.मात्र खाजगी डॉक्टर, कंपाऊडरचा गुरूवारी स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.शुक्रवारी त्यांचे अहवाल येणे अपेक्षित होते,मात्र शनिवारी रात्री उशिरापर्यत आले नाहीत.त्यामुळे डफळापूरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.कोरोना बाधितावर उपचार केलेला बाजमधील डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे डफळापूरचा डॉक्टरांच्या रिपोर्ट विषयी नागरिकांत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.