जत,प्रतिनिधी : जत शहरातील 54 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.जत शहरात यामुळे बाधिताची संख्या 6 तर जत तालुक्याची संख्या 116 वर पोहचली आहे.
जत शहरातील या बाधिताचा काही दिवसापुर्वी अपघात झाला होता.त्याला उपचारासाठी मिरजेतील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले होते.उपचारानंतर या रुग्णाला घरी पाठविण्यात आले होते.पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना कोल्हापुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे कोरोना तपासणीत त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील शिवानुभव मंडप परिसरात हा व्यक्ती राहत होता.परिसरात खळबळ उडाली आहे.