जत शहरातील महामार्गाचे काम अखेर सुरू | मार्केट यार्डसमोरच्या मुरमीकरणाला गती

0
9

जत,प्रतिनिधी : जत शहरातील विजापूर-गुहागर मार्गाचे काम अखेर शुक्रवार पासून सुरू झाले आहे.विजापूरकडे जाणाऱ्या मार्गा कडून बाजार समिती समोरचा मार्ग मजबूतीकरण करण्यात येत आहे.वर्षभरापासून विविध वादामुळे रखडलेल्या या मार्गाचे अखेर आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या दणक्याने सुरू करण्यात आले आहे.

विजापूर-गुहागर हा महत्वाचा मार्ग जत शहरातून जातो आहे.





मुख्य मार्गअसल्याने मोठ्या प्रमाणात या मार्गावरून वाहतूक सुरू असते.त्यामुळे या मार्गाचे राष्ट्रीय  महामार्ग विभागाकडून या मार्गाचे काम करण्यात आले आहे. जत शहरात महामार्ग अनेक दिवसापासून विविध वादामुळे रखडला होता.नगरपरिषद,मार्गाची रुंदी,राजकीय वादामुळे वारवांर कामाला खो बसला होता.गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्याचे बेहाल झाले आहे.खड्डे,चिखल यामुळे वाहने चालविणे तर सोडा साधे चालताही येत नव्हते.




त्यामुळे संताप व्यक्त होत होता.या पार्श्वभूमीवर चार दिवसापुर्वी आमदार विक्रमसिंह सांवत यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवत तातडीने काम करण्याच्या सुचना देत कानउघाडणी केली होती.अखेर लॉकडाऊनचा मुर्हुत साधत हे काम चालू करण्यात आले आहे.



जत शहरातील महामार्गाचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here