संखचे अप्पर तहसीलदार यांची चौकशी करा | युवासेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

0



संख,वार्ताहर : संख,(ता जत) येथील अप्पर तहसीलदार यांच्या मनमानी व पक्षपाती कारभाराबाबत चौकशी करण्याची मागणी युवासेना जत तालुका उपप्रमुख प्रवीण अवरादी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनव्दारे केली आहे.निवेदनाची प्रत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना दिली आहे. 



निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासून संख येथील अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ हे काम पाहत आहेत.यांचा कारभार हुकूमशाही पद्धतीचा आहे.कामानिमित्त भेटण्यासाठी गेलेल्या लोकप्रतिनिधी,संघटनेचे पदाधिकारी यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही.त्यांच्या बरोबर उध्दट वर्तन केले जात आहे.मी घेतलेले निर्णय न्यायालयसारखे असतात,असे ठासून सांगतात.कार्यलयात कामासाठी गेलेले शेतकरी, वृद्ध, निराधार लोकांचे शंकाचे निरासन करून दिले जात नाही. तसेच गौण खनिजच्या बाबतीत उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यास हरकत नाही.





परंतु शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात घराचे बांधकाम करण्यासाठी रायल्टिच्या पावत्या भरुन वाळू उपलब्ध करुन घेतली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय  यांच्याकडून भीमा नदी पात्रातून गौण खनिज वाहतूक परवाना घेऊन वाळू घेतली आहे.शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतकडून बांधकाम परवाना घेऊन वाळू आपल्या शेतात साठवणूक केली आहे.यामध्ये संख येथील महेश शिवाणा बागेळी यांची सर्वे नंबर 139/4  यांना अप्पर तहसीलदार यांनी दिनांक 19 जून व 07 जुलैला 12 ब्रास वाळू साठवले बाबत 6 लाख 68 हजार 950 रूपयेची दंडाची नोटीस बजावली आहे.  प्रकाश भिमाणा कनमडी सर्वे नंबर 373/1यांना दि.19 जून व 16 जुलै रोजी 12 ब्रास वाळू साठवले बाबत 6 लाख 68 हजार 950 रुपये एवढ्या दंडाची नोटीस बजावली आहे. रामांना भिमशा कुंभार सर्वे नंबर 405/5 यांना दि.19 जूनला 15 ब्रास वाळू साठवले बाबत बाबत यांना 8 लाख 35 हजार 875 रुपये एवढ्या दंडाची नोटीस पाठवली आहे.

Rate Card







शेतकऱ्यांनी अप्पर तहसीलदार यांना प्रत्यक्षात भेटून कारवाई बाबत विचारले असता व लेखी कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा त्यांचे कोणतेही म्हणणे अप्पर तहसीलदार यांनी ऐकून न घेता मनमानी व पक्षपाती कारभार करत आहेत.शेतकऱ्यांनी रीतसर गौण खनिज परवाना असताना सुद्धा जाणून बुजून त्रास देत आहेत. तसेच मोठ्या वाळूतस्कर करणाऱ्याना अभय देण्यासाठी त्या शेतकऱ्यावर कारवाई करण्याचे नाटक करीत आहेत. पिसाळ यांनी आपला विशेष अधिकाराचा गैरवापर करीत आहेत.तरी गरीब शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे.याची आपण तात्काळ दखल घेऊन  यांची खातेनिहाय चौकशी करुन कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

     

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.