
जत,प्रतिनिधी : जतचे माजी आमदार मधुकर कांबळे यांचे सांगली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
मुत्यूसमयी त्याचे वय 58 वर्षे होते.
1995-1999 या काळात ते जतचे आमदार होते.या काळात त्यांनी तालुक्यातील सिंचन व्यवस्था मजबूत करण्याचे प्रयत्न केले होते.तालुक्यातील संख मध्यम प्रकल्पासह सुमारे 7 मोठ्या तलावाची निमिर्ती त्यांच्या काळात झाली होती.
त्याशिवाय कंठीपर्यत म्हैसाळ कालव्याची खुदाई त्यांच्या काळात झाली होती. रस्ते, ग्रामीण पाणी योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना या कामाना गती दिली होती. पुढे बरीच वर्षे त्यांनी भारतीय जनता पार्टीत काम केले.
सध्या त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत सामान्य जीवनच जगत होते.कर्नाटकातील अथणी तालुक्यात ते मुक्कामी होते.




