जत,प्रतिनिधी : जत,वळसंग व शेगाव येथील कोरोना बाधिताच्या जवळच्या संपर्कातील 19 जणांना संस्था क्वोरोंटाईन तर 50 जणांना होम क्वोरोंटाईन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
बुधवारी जत,वळसंग व शेगाव येथील प्रत्येक एक अशा तिंन जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला आहे. त्यात जतमधील जवळचे 4,लांबचे 9,शेगावमधील जवळचे 8,लांबचे 9,वळसंगमधील जवळचे 7,लांबचे 32 जणांना संस्था, होम क्वोरोंटाईन करण्यात आले आहे.
कोरोना रुग्ण सापडताच प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली आहे. गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी बाधित सापडलेल्या परिसरात परिसराची पाहणी करून स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुचना दिला.परिसरात औषध फवारणीसह घरटूघर नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील 7 जण संस्था क्वोरोंटाईन,तर 32 जण होम क्वोरोंटाईन करण्यात आले आहेत.परिसर सील करण्यात आला आहे.