जत शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील गटारी तुंबल्या | परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत शहरातील भाग क्रमांक एक मधील गटारी तुंबल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, ढासांचे प्रमाण ही खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत वारंवार तक्रार करून देखील पदाधिकारी, नगरपरिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होत आहेत.या गटारी तातडीने स्वच्छ कराव्यात,अशा मागणीचे निवेदन या परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज देसाई यांना दिले आहे. 

जत शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील गटारी अरूंद आहेत.त्याची स्वच्छता केली जात नाही.त्यामुळे गटारीत कचरा साचत असून पाण्याचा प्रवाह अडून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी परसरली आहे. अनेक ठिकाणी गटारीतचे प्रवाह बदलले असून लोकवस्तीत गटारीचे सांडपाणी घुसत आहे.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात औषध फवारणी व स्वच्छता केली जात असताना या प्रभागात नगरपरिषदेचे दुर्लक्ष का?असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.नगरपरिषदेने तात्काळ गटारीतील स्वच्छता करावी अशी मागणी आहे.

जतच्या प्रभाग एकमध्ये गटारीचे पाणी असे लोकवस्तीत घुसत आहे.

Attachments area

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.