संख सोसायटीचे चेअरमन राजेंद्र पाटील,व्हा.चेअरमन शरणाप्पा शिळीन यांचा सत्कार

0
6

संख,वार्ताहर : संख सर्व सेवा सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी राजेंद्र बसगोंडा पाटील,व्हा.चेअरमनपदी शरणाप्पा शिळीन यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संख ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर निवडीबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.पाटील,शिळीन सांचा सत्कार भाजपा नेते डॉ.आर.के.पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.

सोसायटीवर अडीच वर्षापुर्वी भाजपचे ताकवान नेते डॉ.आर.के.पाटील यांच्या नेतृत्वाखाली पँनेलने सत्ता मिळविली होती.पहिल्या टर्ममधिल पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर ही पदे रिक्त झाली होती.तेथे पाटील व शिळीन यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी सत्ताधारी माजी सभापती तथा डॉ.आर.के.पाटील गटाचे 8 संचालक,पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी डॉ.आर.के.पाटील म्हणाले कि,सभासदानी आमच्या पँनेलवर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यात आमचे पदाधिकारी यशस्वी झाले आहेत.संख सारख्या मोठ्यातील सर्व सेवा सोसायटी शेतकऱ्यांचा आर्थिक हातभार ठरली आहे.दुष्काळी परिस्थितीतही सोसायटीची वाटचाल उज्वल आहे.सोसायटीच्या आर्थिक मदतीने

शेतीसह शेतकरी समृद्ध करण्यासाठी आमचे नवे पदाधिकारी सक्षमपणे काम करत आहेत.




राजेंद्र पाटील म्हणाले,माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावून सोसायटीचा नावलौकिक वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,शेतकऱ्यांच्या हक्काचे आर्थिक केंद्र बनविण्यात प्रयत्न राहिल.

यावेळी सरपंच सौ.मंगलताई पाटील,श्रीकांत पाटील,तम्मू बागेळी,किरण पाटील सर,विजय पाटील,मावळते चेअरमन भाऊराया बिरादार,व्हाईस चेअरमन मैनुद्दीन जमादार,संचालक मल्लिकार्जुन बागेळी,अब्बास सैय्यद,डॉ.सागर पाटील,निंगु पाटील,हिरेमठ सर,मुबारक सौदागर,सोसायटी सर्व संचालक पदाधिकारी व सोसायटी कर्मचारी उपस्थित होते.


संख सोसायटीच्या चेअरमनपदी प्रा.बि.आर.पाटील व व्हा.चेअरमनपदी शरणाप्पा शिळीन यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here