दुध दर वाढवा,संखात स्वा.शेतकरी संघटनेचे आंदोलन

0

संख,वार्ताहर : दुध दरवाढीसाठी राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या दुध बंद आंदोलनाला पांठिबा देत संख ता.जत येथे 

छत्रपती शिवाजी महाराज व श्री. बसवेश्वर यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक घालून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला.यावेळी अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ,सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाचे कारण देत दूध दर पाडण्यात आले आहेत.त्यामुळे पशूपालक शेतकरी अडचणीत आले आहे.जेथे पंचवीस रुपये दर देणे आवश्यक आहे.तेथे दुध संघाकडून प्रति लिटर 14 ते 18 रुपये लिटर एवढा दर दिला जात आहे.दुसरीकडे पशूखाद्याचे दर गगणाला भिडले आहेत.अशा स्थितीत दुध व्यवसाय परवडत नाही.त्यामुळे पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.


Rate Card


अशा आहेत,मागण्या केंद्र सरकारने 23 जूनला 10 हजार टन दुध पावडर आयात करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा,30 हजार टन दुध पावडरचा बफर साठा करावा तसेच निर्यात अनुदान प्रतिकिलो 30 रुपये देण्यात यावे,दुध पावडर टू बटर इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावी, पुढील तीन महिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या  खात्यावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करावे,संपूर्ण महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित दुधाला दरवाढ भाव मिळावी या मागण्याचे निवेदन देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष श्रीगोंदा बिरादार, अध्यक्ष नागनाथ शिळीन,उपाध्यक्ष राजकुमार बिरादार,तालुका युवा आघाडी अध्यक्ष भीमाशंकर बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.दुध दरवाढीबाबात अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांना निवेदन देण्यात आले.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.