जत,प्रतिनिधी : राज्यामधील दुधदराची झालेली घसरण व अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी महायुती शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहून न्याय देण्याची भूमिका घेईल. महादेव जानकर दुग्धविकास मंत्री असताना दुधाला देशात एक नंबरचा दर देण्याचे ऐतिहासिक काम त्याच्या हातून घडलं असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यव्यापी दूध आंदोलनाच्या अनुषंगाने महायुतीची लाईव्ह बैठक संपन्न झाली. या बैठकी मध्ये फडणवीस बोलत होते, राज्यामध्ये महायुतीच्या काळात शेतकऱ्याला प्रतिलीतर 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करीत किमान प्रतिलीतर 27 रुपये दुधदर देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय तत्कालीन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी घेतला व अडचणीतील शेतकऱ्यांना आधार दिला.
हेही वाचा.
…त्या पाच मुत्यु प्रकरणाचा पुन्हा तपास होणार | विक्रम ढोणे यांचे उपोषण मागे : पोलीसाचे आश्वासन |
सरकार आपले वाटायचं शेतकऱ्यांना परुंतु आत्ताच्या काळात शेतकरी मोठा अडचणीत आला असून दूध दरासाठी रासप रस्त्यावर्ती उतरली असून त्यांच्या सोबत संपुर्ण महायुतीतील घटक पक्ष एकत्रित येऊन पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा फडणवीस व महायुतीच्या नेत्यांनी दिला असून महाराष्ट्रभर तहसील, जिल्हाधिकारी यांना उद्या निवेदन देऊन 1 ऑगेस्ट रोजी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महायुती राज्यभर करणार असल्याची माहिती बैठकीला उपस्थित असणारे रासपचे माजी सांगली जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी दिली.
हेही वाचा.
गलाई व्यवसायिकाचा खून | खानापूर तालुक्यातील माधळमुठी येथील घटना |
यावेळी रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी दुग्धविकास मंत्री आ.महादेवरावजी जानकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक तथा माजी कृषी राज्यमंत्री आ.सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायकराव मेटे, रिपाईचे नेते तथा माजी समाजकल्याण राज्यमंत्री अविनाश महातेकर, भाजप किसान मोर्चा अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे, माजी विधानसभा अध्यक्ष आ.हरिभाऊ बागडे यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलनाची भूमिका मांडली. यावेळी बैठकीला रासपच्या वतीने आ.रत्नाकर घुट्टे, रासपचे महासचिव तथा माजी शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील, संघटनमंत्री माऊली सलगर, रणजित सूळ यांच्या सहित महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जत येथून रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांनी सहभाग घेतला.