…त्या पाच मुत्यु प्रकरणाचा पुन्हा तपास होणार | विक्रम ढोणे यांचे उपोषण मागे : पोलीसाचे आश्वासन
जत प्रतिनिधी : कोरोना लॉकडाऊन काळात जत तालुक्यात पाच मृत्यू प्रकरणांनी चौकशीसाठी चालू असलेले उपोषण पोलीस प्रशासनाच्या लेखी आश्वासन नंतर मागे घेण्यात आले आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डुबुले,
प्रशिणार्थी डिवायएसपी डॉ.निलेश पालवे जतमधिल त्या प्रकरणातील फिर्यादी,नातेवाईकांची चर्चा केली त्यांची मागणी समजावून घेत या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश पोलीसांना दिल्याचे उपोषण कर्ते विक्रम ढोणे यांनी सांगितले.
हेही वाचा.
गलाई व्यवसायिकाचा खून | खानापूर तालुक्यातील माधळमुठी येथील घटना |
जतमध्ये ढोणे यांनी या पाच मुत्यू प्रकरणे तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांकडून दडपून टाकण्यात आले आहेत.त्या पाचही प्रकरणाचा योग्य तपास होऊन संशयित असणाऱ्या वर कारवाई करावी,अशा मागण्यात ढोणे यांनी पोलीसा समोर ठेवल्या होत्या.
महादेव जानकारांनी देशात एक नंबर दुधाला दर दिला | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस |
दरम्यान उपोषण चालू असताना प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या,उपोषणाची दखल घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी जतमध्ये येत त्या पाच मृत्यू प्रकरणातील फिर्यादी,संशयित साक्षीदार व काहींच्या कुटुंबाची भेट घेतली.मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने चर्चा केली.त्यात पाचही प्रकरणाचा योग्य तपास करण्याचे आदेश दिले.
दरम्यान प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांच्या दालनात तहसीलदार सचिन पाटील,प्रशिणार्थी डिवायएसपी डॉ.पालवे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत या पाचही मुत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे लेखी आश्वासन यांनी दिल्यानंतर आमरण उपोषण हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे, असे ढोणे यांनी सांगितले.त्यामुळे मृत्यू प्रकरणातील नातेवाईकांना यामुळे न्याय मिळणार आहे.
या आंदोलनास आमदार विक्रमसिंह सावंत,माजी सभापती प्रकाश जमदाडे , जनसुराज्य नेते माजी उपसभापती अडव्यापा घेरडे,शिवाजी शिंदे,काका शिंदे,आप्पाराया बिराजदार,श्रीपाद अष्टेकर,प्रमोद हिरवे,अप्पा शिंदे,युवराज निकम,उत्तम चव्हाण,अशोक कोळी,अप्पू माळी,अमित दुधाळ,दिनकर पतंगे यांनी भेट देत पाठिंबा दिला.काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप,शिवसेना,बसप,का
जत येथील विक्रम ढोणे यांना कारवाईचे लेखी पत्र देताना प्रशिक्षिणार्थी डिवायएसपी डॉ.निलेश पालवे.