दुध दरवाढीसाठी 21 जुलैला राज्यव्यापी दूध संकलन बंद

0

सांगली,प्रतिनिधी : राज्यात पाणी महाग आणि दूध स्वस्त अशी विदारक परिस्थिती आहे, या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणून जिल्ह्यातील दूध संघांनी मंगळवारी दूध संकलन बंद करून सहकार्य करावे .तर शेतकऱ्यांनी दूध घालू नये,असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी केले आहे.

खराडे म्हणाले सध्या गायीचे दूध पंधरा ते अठरा रुपये आहे तर बिसलेरी पाण्याची एक लिटर ची किंमत वीस रुपये आहे याचाच अर्थ पाणी महाग आणि दूध स्वस्त हे वास्तव आहे यामुळे दुढ उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे ग्रामीण महाराष्ट्रातील अर्थकारण दूध व्यवसायावर अवलंबून आहे  कोट्यवधी छोटे मोठे शेतकरी दुग्ध व्यवसायास शी संबंधित आहेत मात्र दूध दर कमी झाल्यामुळे संपूर्ण अर्थकारण कोलमोडले आहे त्यामुळेच दूध दरात वाढ होणे गरजेचे आहे.

Rate Card

राज्यात दररोज एक कोटी एकोणीस लाख लिटर तर जिल्ह्यात सुमारे तेरा ते चौदा लाख लिटर दूध संकलन होते त्यातच केंद्र सरकारने गरज नसताना दहा हजार टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे देशात मोठ्या प्रमाणात गायीच्या दुधा पासून भुकटी केली जाते आयात केलेल्या भुक्तीवरील आयात करही कमी केल्याने तिची किंमत कमी आहे.
त्यामुळे देशा अंतर्गत भुकटी ची विक्री कमी होणार त्यामुळे दुधाचे दर आणखी कमी होणार आहेत म्हणुन च माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी एक दिवस दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळेच दूध संघांनी मंगळवारी दूध संकलन न करता आंदोलनास सहकार्य करावे,त्याच बरोबर गावागावांतील दूध डेअरी व दूध संस्थांनीही दूध संकलन करू नये, तसेच शेतकऱ्यांनीही दूध डेऱ्यांना न घालता आंदोलन यशस्वी करावे.

जिल्ह्यातील राजारामबापू,वसंतदादा, हुतात्मा, चितळे,थोटे, विराज, देशमुख, प्रचिती,आदीसह सर्वच खाजगी व सहकारी दूध संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन करत आहोत,आंदोलन यशस्वी करण्यासाठी पोपट मोरे,भागवत जाधव संजय बेले,संजय खोलखुंबे,संदीप राजोबा,भरत चौगुले, शिवाजी पाटील, अँड.शुमशुद्दिन संडे, रमेश माळी,राजेंद्र माने राम पाटील,अख्तर संदे,प्रकाश गायकवाड,जोतिराम जाधव आदीसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.