जत,प्रतिनिधी : खरीप हंगामाच्या प्रांरभीच बाजरी,भूईमुगसह अन्य पिकाचे बोगस बियाणामुळे अनेक गावात दुबार पेरणी करण्याची वेळ आहे आहे.आता पिके चांगली आली असताना कृषी दुकानातून विविध औषधे,खतांचे दर वाढवून शेतकऱ्यांची लुट केली जात असल्याचे शेतकऱ्याच्या तक्रारी आहे.
सध्या खरीप हंगाम मध्यावर आल्याने युरियाची मागणी वाढली आहे.यांचा फायदा घेत काही कृषी दुकानातून किंमतीपेक्षा दर घेऊन युरीयाची विक्री केली जात आहे.कोणत्याही कंपनीचा युरीया असला तरी त्यांचा दर एकच असल्याचेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.याकडे कृषी विभागाच्या भूमीपुत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत.