प्रशासक सरपंच निवडींमध्ये कृषी पदवीधरांना प्राधान्य देण्यात यावे : प्रदिप नागणे
जत,प्रतिनिधी : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यात हजारो ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण होऊनही तिथे निवडणुका घेणे शक्य नसल्याकारणाने काही काळासाठी प्रशासक सरपंच नेमण्याची वेळ आलेली आहे.यामध्ये कृषी पदवीधरांना प्राधान्य देण्यात यावे,अशी मागणी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे जत तालुका अध्यक्ष प्रदिप नागणे यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,तालुक्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक सरपंच नेमताना शिक्षित उमेदवार असतील तर त्याठिकाणी गावचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवला जाण्याची शक्यता अधिक आहे.यानिमित्त पदवीधरांना आपण प्राधान्य दिल्यास कृषी आधारित अर्थव्यवस्था असणाऱ्या गावकारभारात पदवी घेतलेले उमेदवार त्यांच्या शिक्षणाच्या अनुभवावरून चांगला कारभार करून दाखवतील असा विश्वास वाटतो.शिक्षित पदवीधराना यानिमित्त गावगाडा चालविण्याचा अनुभव मिळेल आणि गावांमध्ये अकारण होणारा राजकीय संघर्ष काही काळासाठी का होईना थांबवता येईल.पूर्ण देशासमोर एक आदर्श यानिमित्त ठेवण्याची संधी राज्यसरकार ला मिळेल.तरी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या या मागणीचा विचार करावा अशी मागणी, निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष संग्राम शिंदे,तालुका संघटक विनोद परीट,सदस्य ऋतिक साळुंखे उपस्थित होते.

प्रशासक सरपंच निवडींमध्ये कृषी पदवीधरांना प्राधान्य देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.