जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पाच मृत्यूप्रकरणांचा तपास सीआयडीमार्फत (राज्य गुन्हे अन्वेषन विभाग) यांच्यामार्फत करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.
ढोणे यांच्या उपोषणास तालुक्यातील अनेक राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठींबा दिला.यामध्ये आमदार विक्रमसिंह सावंत,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,नगरसेवक भूपेंद्र कांबळे,अँड.युवराज निकम,संतोष भोसले, दिलीप सोलापुरे आदींचा समावेश आहे.
जत तालुक्यातील राहूल काळे मृत्यूप्रकरण, कस्तुरी शिवणकर मृत्यूप्रकरण,म्हाळाप्पा मासाळ मृत्यूप्रकरण,मांतेश पाटील,तुषार शिंदे या पाच जणांच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडी कडून चौकशी करण्याची मागणी ढोणे यांनी लेखी निवेदनात केली आहे.कोरोना महामारीचे संकट जगावर आहे.महाराष्ट्र शासन या संकटाशी मोठ्या हिंमतीने झुंजत आहे. यात शासन यंत्रणा मोलाची भुमिका बजावत आहेत. राज्याचे पोलिस दल तर रात्रंदिवस अक्षरश: लढाई करत आहे. या परिस्थितीची परिपुर्ण जाणीव आहे.मात्र जत तालुक्यात लॉकडाऊनचा गैरफायदा घेत पाच खून प्रकरणे दडपून टाकण्यात आली आहेत.
हा प्रकार जत तालुक्यातील स्वाभिमानी नागरिकांना चीड आणणारा आहे. पोलिस दलातील खलनायक प्रवृत्तीने हे घडवून आणले आहे. येथील राहूल दत्तात्रय काळे, खोजनवाडी येथील कस्तुरी लक्ष्मण शिवणकर, साळमगेवाडी येथील म्हाळाप्पा शिवाजी मासाळ, बिळूर येथील महांतेश रामगोंडा पाटील यांचे संशयित मृत्यू गेल्या दोन महिन्यात झाले आहेत. यातील काही मृत्यू हे खून केल्याने झाले आहेत, मात्र पोलिस तपासात ही प्रकरणे तडजोडी करून मिटवण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक रामदास शेळके हे जत पोलिस ठाण्यात कार्यरत असताना ही सर्व प्रकरणे घडलेली आहेत. या प्रकरणात त्यांची भुमिका संशयास्पद आहे. आरोपींच्या बाजूने तपास झालेला आहे. तक्रारदार,साक्षीदारांना दबावात घेतलेले आहे.
राहूल दत्तात्रय काळे (वय 30, रा. मेंढपाळनगर जत)दि.17 जून 2020 रोजी रात्री राहुल काळे यांचा जत पोलिस स्टेशनच्या पाठीमागे संशयित मृत्यू झाला. कस्तुरी लक्ष्मण शिवणकर (वय 45, रा. खोजनवाडी, ता.जत)’मुलाने आईचा खून केल्याचा संशय’ अशी वृत्तपत्रात बातमी आली.म्हाळाप्पा शिवाजी मासाळ (वय 27, रा. साळमगेवाडी,ता. जत) युवकाची आत्महत्या अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. परंतु ही आत्महत्या नसून हत्याच आहे अशी गावामध्ये चर्चा आहे. महांतेश रामगोंडा पाटील (वय 27, रा. बिळूर ता.जत) या युवकाचा दि. २६ जून 2020 रोजीच्या वृत्तपत्रात ‘पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला असून वडिलांची मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला’, अशी बातमी प्रसिद्धी झाली आहे.
‘लॉकडाऊनपेक्षा शिस्त पाळण्याची गरज’ |
तुषार संभाजी शिंदे (वय 16, रा. हिवरे ता. जत) याचा जिलेटीनमध्ये स्फोट होऊन तुषार शिंदे यांचा मृत्यू झाला. 21 मार्च 2020 रोजी घडलेले आहे.या पाचही प्रकरणे पोलिसांनी दडपून टाकली आहेत.या दडपलेल्या प्रकरणाचा योग्य तपास होणे शक्य नाही. विविध मार्गाचा अवलंब करून हे प्रकरण दडपून टाकण्यात आले आहे. हे प्रकरण तडजोड करून मिटवण्यात आलेले आहे. याची पोलिस स्टेशनला नोंदही घेण्यात आलेली नाही.असा आरोप निवेदनात केला आहे.
दडपलेल्या मृत्यू प्रकरणांची सिआयडी चौकशी व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषण चालू आहे या उपोषणाला आमदार विक्रमसिंह सावंत , भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड.श्रीपाद अष्टेकर,प्रकाश जमदाडे,कॉग्रेस तालुकाध्यक्ष आप्पाराय बिराजदार , सभापती भूपेंद्र कांबळे युवक कॉंग्रेस अध्यक्ष विकास माने,ॲड.युवराज निकम,संतोष भोसले,आकाश बनसोडे अनिसचे रवी संगोलाकर,कॉम्रेड अर्जुन कुकडे, रासपाचे तालुकाध्यक्ष किसन टेंगले, लक्ष्मण पुजारी,विलास सरगर,सरपंच परिषदेचे बसवराज पाटील, बसापाचे जक्काप्पा सर्जे,काकासो शिंदे,सिधरेद्दी सावकार,गोतम ऐवळे,महादेव हूचगोंड,दिनकर पतंगे,सलीम नदाफ,सलीम नदाफ,अशोक कोळी,प्रदीप नागने,रमजान नदाफ,बाळासाहेब पांढरे,युवराज जाधव आणि राहुल काळे,दरेश्वर चौगुले, महांतेष पाटील यांचे नातेवाईक यांनी यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला.तर बसवसेना,युुवक कॉंग्रेस,कामगार सेना,
राष्ट्रीय समाज पक्ष,आम आदमी पार्टी या संघटनांनी पांठिबा दिला.
जत येथील विक्रम ढोणे यांच्या उपोषणास आमदार विक्रमसिंह सांवत यांनी भेट देत पांठिबा दिला.





