विद्यापीठ अनुदान आयोगाची वास्तवाशी नाळ तुटली ; डॉ. सुखदेव थोरात | जतच्या राजे रामराव महाविद्यालयात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण कसे कधी ?

0




जत (प्रा. तुकाराम सन्नके): ‘हल्ली युजीसीची वास्तवतेशी असणारी नाळ तुटलेली दिसुन येत आहे. वास्तवतेचा अभ्यास न करता केवळ फतवे काढणे, हेच एकमेव काम यूजीसी करत आहे. परीक्षा घ्यायला हव्यात हे सांगताना त्या कशा घेता येतील, त्याच्या मार्गदर्शक सूचना व शक्यतेचा अभ्यास केलेला दिसत नाही. करोना महामारी संकट अधिकच गडद होत असताना आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचे दोन महिने उलटून गेले असताना गतवर्षातील परीक्षा घ्या, असा दुराग्रह करून तरुणांना मानसिक वेठीस धरणे योग्य नाही,’ अशी खरमरीत टीका युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केली. ते जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन चर्चासत्रात बोलत होते.















12 वी बोर्ड परीक्षेत राजे रामराव महाविद्यालयात डफळापूरची सौजन्या महाजन प्रथम |



         करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण कसे? कधी? आणि कोण देणार? या विषयावर राजे रामराव महाविद्यालयाने या खुल्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना युजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. थोरात यांनी परीक्षा घेण्याच्या आग्रहाबद्दल युजीसीच्या धोरणांवर जोरदार टीका केली. यीजीसीने देशातील सद्यःस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, ‘आपत्कालीन परिस्थितीत उच्च शिक्षणाचा वेगळा कृती आराखडा तयार करून तात्पुरत्या काळासाठी उच्च शिक्षणाचे स्वरूप बदलून तरुणाच्या बुद्धीला काम दिले पाहिजे.’ एमकेसीएलचे मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी ग्रामीण भागातील तरुणांना जागतिक प्रवाहात आणणारे शिक्षण देण्यासाठी तंत्रज्ञानाने आणि शिक्षकांनी तयार व्हायला पाहिजे. 

Rate Card




बेरोजगारी वाढत असेल तर त्या शिक्षणातील उणिवा दूर केल्या पाहिजेत, असे मत मांडले. मुंबई विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या सरचिटणीस डॉ. मधू परांजपे यांनी सर्वेक्षणाच्या आधारे सांगितले की, उच्च शिक्षणातील ऑनलाइन पद्धत योग्य ठरणार नाही. शिक्षणाच्या मूळ तत्त्वाला छेद देऊन गरिब आणि श्रीमंत यांच्यात पुन्हा वाढण्याची भीती आहे. पुण्यातल्या बीएमसीसी महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रशांत साठे म्हणाले, परिस्थिती भयावह आहे. मात्र, या परिस्थितीची कुणी ढाल करू नये. नव्या आव्हानांना आणि प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शक्य असेल तिथे ऑनलाइन, शक्य असेल तिथे ऑफलाइन पद्धतीचा वापर करून शिक्षण चालू झाले पाहिजे. ग्राहक पंचायतीच्या राज्य सहसंघटक मेधा कुलकर्णी यांच्यासह काही विद्यार्थ्यांनीही बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेतील अडथळे व धोक्यांचे विवेचन केले. येणा-या काळात शिक्षण पद्धती कशी असावी यासाठीचा एक कृती आराखडा चर्चासत्रात मांडण्यात आला. या आराखड्याची योग्य दखल घेऊन सरकार आणि युजीसीने तात्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली.

















टोणेवाडीत तीन सिमेंट बंधारे गायब | वसुलीचे निश्चित केलेले रक्कम वसूलीस केराची टोपली |



           चर्चासत्राच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठलराव ढेकळे यांनी सर्वांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतातून शिक्षणव्यवस्थेतील नवी आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ श्रीकांत कोकरे यांनी केले तर डॉ शिवाजी कुलाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ संजय लठ्ठे व प्रा राजाराम सुतार यांनी तंत्रसाहाय्य केले. या चसर्चसत्राला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ, राज्यातील अनेक शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच देश-विदेशातून साडेचारशेहून अधिक शिक्षणप्रेमींनी झुम अँपच्या माध्यमातून हजेरी लागली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.