राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी रुपये बंधीत निधी प्राप्त | ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ

0

आतापर्यंत हजार 913 कोटी रुपये प्राप्त

ग्रामपंचायतपंचायत समित्या व जिल्हा परिषदांना भरीव निधी

मुंबई राज्यामधील ग्रामपंचायतीपंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी प्राप्त झाला आहे. लवकरच हा निधी जिल्हा परिषदापंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल. यापुर्वी इतक्याच रकमेचा अबंधीत निधी प्राप्त झाला होता. त्यामुळे या आयोगाचा आतापर्यंत हजार 913 कोटी 50 लाख रूपये इतका निधी प्राप्त झाला आहेअशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.

Rate Card

कर्नाटकातून जतला पाणी देण्यासंदर्भात दोन्ही राज्ये सकात्मक ; ना.जयंत पाटील |

            राज्यामधील ग्रामपंचायतीपंचायत समिती व जिल्हा परिषदांना अनुक्रमे 80:10:10 याप्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरीत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थासाठी पंधरावा वित्त आयोगानुसार हजार 827 कोटी रूपये इतका निधी मंजूर आहे. त्यापैकी मागील महिन्यात हजार 456 कोटी 75 लाख रूपये अबंधीत अनुदान (अनटाईड) निधी प्राप्त झाला होता व तो जिल्हा परिषदपंचायत समित्या व ग्रामपंचायतींना कोणत्याही विकास कामावर खर्च करण्यासाठी यापूर्वीच वितरीत करण्यात आला आहे. 

            आता पंधराव्या वित्त आयोगाचा बंधीत निधी हजार 456 कोटी 75 लाख रुपये प्राप्त झाला आहे. हा निधी बंधीत असल्यामुळे तो फक्त पाणीपुरवठास्वच्छताघनकचरा व्यवस्थापन आदी बाबींवर मार्गदर्शक सुचनेनुसार खर्च करण्यात येईल. लवकरच हा निधी जिल्हा परिषदापंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईलअसे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

पेरलेले बियाणे उगवलेच नाही | नुकसान भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी |

            यानुसार आतापर्यंत एकूण वार्षिक नियतव्यचा 50 टक्के (हजार 913 कोटी 50 लाख रूपये) निधी प्राप्त झाला आहे. या योजनेतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी प्राप्त झाल्यामुळे ग्रामीण भागात निश्चितच चांगल्या प्रकारे विकास कामे होतील. या निधीतून ग्रामीण भागात चांगल्या दर्जाची विकासकामे करण्यात येतीलअसे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.