शेगावमधील मारहाण प्रकरण : कठोर कारवाईसाठी फिर्यादीचे आमरण उपोषण
जत,प्रतिनिधी : शेगाव ता.जत येथील प्रमोद दादासाहेब सांवत यांना शिवीगाळ करून मारहाण केलेल्या संशयितांना आरोपींना पकडून कारवाई करावी या मागणीसाठी सांवत सोमवारी ता.20 जुलै रोजी आमरण उपोषणास बसणार आहेत.तसे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी,तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे.
गिरगावच्या महिला संरपचास मारहाण
निवेदनात म्हटले आहे की,फिर्यादी प्रमोद सांवत हे 13/5/2020 रोजी सकाळी 11.30 वाजता हनुमंत संस्थे समोरून आपल्या दुकाना कडे जात असताना सांवत यांना रस्त्यात अडवून हरी शिंदे यांनी धमकी दिली.त्यानंतर मुलगा रोहित शिंदे,राहुल शिंदे व नातलाग गौरव दत्तात्रय निकम यांना बोलवून घेत लोंखडी पाईप,रॉडने चौघानी गंभीर मारहाण करून जखमी केले होते.मारहाण होत असताना नानासो बोराडे,रविंद्र पाटील,विनोद बोराडे यांनी सोडविण्याचा प्रयत्न करूनही संशयितांनी सांवत यांना बेशुध्द होईपर्यत मारहाण केली.

मारहाण करणाऱ्यावर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.वैद्यकीय तपासणीही करण्यात आली होती.तत्कालीन पो.नि.रामदास शेळके यांनी 324,326 असा किरकोळ गुन्हा आहे.आरोपींना घेऊन या असे सांगितले होते.मात्र आरोपी व नातेवाईकांनी राजकीय लोंकाच्या संगनमताने पो.नि.शेळके यांनी सांवत यांना शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक देण्यात आली.गंभीर गुन्हा असताना किरकोळ कलमे लावून प्रकरण मिटविण्यासाठी आरोपींना सहानुभूति दाखवत सोडून देण्यात आले आहे.मला या आरोपीपासून जीवाला धोका आहे.कारवाई करा म्हणून सांगूनही तुम्हाला काय करायचे ते करा म्हणून मला पोलिस ठाण्यातून हाकलून लावण्यात आले होते
मोबाइल दिला नाही,म्हणून शाळकरी विद्यार्थ्याची आत्महत्या |
जेथे न्याय मिळण्याची अपेक्षा होती.तेथे अन्याय झाला आहे.आरोपींना सोडल्याने ते मला आजही धमकावत असून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.आरोपीकडून माझ्या व कुंटुंबियाच्या जिवीतास धोका आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करावी. मला मारहाण केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करावी व मला पोलीस संरक्षण मिळावे,या मागणीसाठी जत प्रांत कार्यालया समोर सोमवार 20 जूलैपासून आमरण उपोषणास बसत असल्याचे सांवत यांनी निवेदनात म्हटले आहे.