सामाजिक | अहंकार नाही,तर नाती जपा

0

सुप्रिया आणि सविता दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी, छान एकमेकींना समजून घेणाऱ्या,एकमेकांसाठी धावून जाणाऱ्या,कॉलेज पर्यंत छान मैत्री टिकवून ठेवलेल्या मैत्रिणी. परंतु काही गैरसमज झाले, ते वाढत गेले व पुढे कोण आधी बोलणार या अहंकारात त्यांची मैत्री संपून अबोला सुरु झाला. बरं इथवर थांबलं तर ठीक पण त्यांनी एकमेकींवर गलिच्छ शिंतोडे उडविण्यास सुरुवात केली. अगदी एकमेकींशी सगळे मनातलं शेअर करणाऱ्या त्या मैत्रिणी त्याच माहितीचा दुरुपयोग करून एकमेकींना बदनाम करू लागल्या. एक सुंदर मैत्री डागाळली ती कायमचीच.

शिव्या शाप देणारा नव्हे तर आशीर्वाद देणारा व्यवसाय करा ! |

असे अनेकदा होते, फक्त मैत्रीतच नाही तर अगदी जिवाभावाच्या नात्यात आणि प्रेमात सुद्धा. जे नाते जपण्यासाठी आधी प्राणपणाने धडपडले जाते, पुढे त्याच नात्यावर शिंतोडे उडवून त्याला डागाळले जाते. वेळीच आवर घातली गेली नाही तर या शिंतोड्याचे डाग अधिक गडद होत जातात व पुढे ते नातं फाटतं पण डाग आपली निशाणी कायम सोडून सगळेच विद्रुप करून जाते. अगदी सख्ख्या नात्यातील भाऊ- भाऊ, बहीण भाऊ, आई वडील, मुलगा असो कि प्रेमाच्या आणाभाका घेऊन एकमेकांसाठी अनेक दिव्य करणारी  प्रेमी युगल असो, एका क्षणात जपलेल्या गोष्टींची नासधूस करून मोकळे होण्याची मानसिकता कोठून येते? सगळे संपून फक्त द्वेषच का उरतो?

‘लॉकडाऊनपेक्षा शिस्त पाळण्याची गरज’ |

    काही लोकांना सगळं सहज मिळणारं हवं असत. त्यासाठी कुठलाही त्रास किंवा झळ सोसायची त्यांची तयारी नसते. जोवर गोष्टी सहज मिळतात तोवर त्या यांना छान वाटतात. मग ती वस्तू असो,व्यक्ती असो वा नातं. परंतु जरा कुठे या लोकांना झळ बसली  कि हे आपले निर्णय बदलून मी नाही त्यातला म्हणून मोकळे होतात. काहीही न घडल्याच्या अविर्भावात जगू पाहता. नातं कुठलंही असो त्यात चढ उतार, रुसवे फुगवे,हे येणारच. कोणत्याही नात्यात समोरच्याने किती योगदान दिले हे शोधण्यापेक्षा तुम्ही त्या नात्यासाठी किती धडपडले यावर लक्ष देणं जास्त गरजेचं असते. पण मला अमुक एका नात्यामुळे त्रास होतोय आणि मला ते निभावणे जमणार नाही, हे सांगणे हा शुद्ध पळपुटेपणा झाला. बरं जाताना त्याचा ठपका स्वतःवर येऊ नये म्हणून अशा व्यक्ती  समोरच्यावर शिंतोडे उडवायला अजिबात विसरत नाही. जन्माची अद्दल घडविणारे लांच्छनास्पद शिंतोडे उडवून जातात. अशा वेळी समोरचा पाहत राहण्यापलीकडे काहीच करू शकत नाही.

     नात्याचे ओझे बाळगण्यापेक्षा ते मोकळं कारण कधीही चांगलाच आहे, पण म्हणून ते सोडताना त्यांना डागाळायची  काहीच गरज नसते. आत्मप्रौढी मध्ये स्वताःचेच खरे सिद्ध करण्याच्या नादात आपण एवढे दिवस जोडून राहिलेल्या नात्याला व त्या व्यक्तीला किती मानसिक वेदना देऊन जातोय याचा विचार करण्याची कुवतच बहुदा त्या आत्मप्रौढीत शिलकी राहत नाही.

     आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपल्याला जीव लावणाऱ्या आपल्याच जिवाभावाच्या माणसांना दुखावून त्यावर शिंतोडे उडवून जाण्यात आनंद मानणारे कधी त्या नात्यात होते का? या बाबतीत शंका उत्पन्न होते.नवीन मिळाल म्हणून जुन्याची किंमत शुन्य ठरविणे हा कृतघ्नपणा आहे.

“लढा कोरोनाशी” | नव्या युगाचा आंरभ करा

    स्वभाव न पटलेले नवरा बायको जेव्हा घटस्फोट घेतात तेव्हा ही एकमेकांवर शिंतोडे उडवून स्वतः चे खरेपण ते सिद्ध करु पहात असतात.या क्षणिक रागात पूर्वी चे सहवासाचे सुंदर क्षण सहज दुर्लक्षित करतात. अगदी पटत नसलेल्या नात्याचे एकमेकांवर ओझ लादण्यात काहीच अर्थ नाही हे पटत असल तरी जातांना दोघांनी सामंजस्य  ठेवून एकमेकांवर शिंतोडे न उडवता दूर होणं हे नक्कीच उत्तम वैचारिकतेच लक्षण आहे. आणी याचि जाणीव ठेवून वागणं ही माणूसकी ठरेल.तेव्हा याचा नक्कीच  विचार व्हावा. आणी मिथ्या अहंकार उराशी बाळगण्यापेक्षा नाती जपण्यावर भर द्यायला हवा.

 मनिषा चौधरी 

नाशिक,9359960429

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.