जून्याच संरपचाना प्रशासक म्हणून नेमा : सरदार पाटील
जत,प्रतिनिधी : मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश शासनाने काढले आहेत.यात राजकीय पक्षाचा पदाधिकारी प्रशासक म्हणून नेमावेत,असा उल्लेख केला आहे. त्यामुळे यापुर्वी पाच वर्षे काम केलेल्या अनभुवी असणाऱ्या संरपचास प्रशासक पद द्यावे,अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी केली आहे.

कर्नाटकातून जतला पाणी देण्यासंदर्भात दोन्ही राज्ये सकात्मक ; ना.जयंत पाटील |
पाटील पुढे म्हणाले,राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश शासनाने काढले आहेत.त्यात प्रशासक म्हणून राजकीय व्यक्तीकडे पदभार देण्यात यावे असे म्हटल्याने पुन्हा राजकीय व्यक्तिंना प्रशासक म्हणून निवडणूका होईपर्यत पदभार देण्यात येणार आहेत.मात्र हे पदभाराचे राजकारण होऊन गावाची शांतता भंग होण्याची शक्यता आहे.सध्या कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.कोरोनामुळेच ग्रामपंचायतीच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत.गाव स्तरावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संरपचांनी कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी चांगले काम केले आहे.त्याशिवाय पाच वर्षाचा अनुभव,व वाद-विवाद टाळण्यासाठी विद्यमान संरपचाकडेच शासनाने प्रशासक म्हणून पदभार द्यावा,अन्यथा ग्रामसेवकांना प्रशासक म्हणून नेमावे,असेही सरदार पाटील यांनी म्हटले आहे.