सृष्टी नाईकचे बारावी परिक्षेत घवघवीत यश
जत,प्रतिनिधी : विजयपूर (कर्नाटक) येथील एक्सलंट पी यु सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी कु.सृष्टी विजय नाईक हिने 12 वी सायन्स शाखेत 97.25 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.नुकतेच कर्नाटक राज्यातील एच एस सी बोर्डाचा निकाल जाहीर झाला.
12 वी बोर्ड परीक्षेत राजे रामराव महाविद्यालयात डफळापूरची सौजन्या महाजन प्रथम |
यात सृष्टी हिला भौतिकशास्त्र विषयात 97 गुण, गणित विषयात 99, प्राणीशास्त्र विषयात 98 गुण व रसायनशास्त्र विषयात 95 असे गुण मिळाले आहेत. जत येथील पत्रकार विजय नाईक यांची सृष्टी ही कन्या आहे. तिला महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.