जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील महसूलमधील अधिकारी,मंडल अधिकारी,तलाठ्यांनी कोरोनामुळे कार्यालय बंद आहे.म्हणून सांगत पैसे देणाऱ्यांची अनेक बोगस कामे करून लुट केली आहे.तर सामान्य जनतेला कोरोनाची भिती घालून बेदखल केले जात आहे.पैसे दिल्याशिवाय एकही काम या गावागावातील तलाठी,मंडल अधिकाऱ्यांकडून कामे होत नसल्याचे आरोप आहेत.
कर्नाटकातून जतला पाणी देण्यासंदर्भात दोन्ही राज्ये सकात्मक ; ना.जयंत पाटील |
कोरोनात काळ्या सोने लुटीत काही मंडल अधिकारी,तलाठी गुंतले
कोरेनाच्या पार्श्वूभूमीवर जिल्हा प्रशासन व्यस्त आहे.जतचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही कोरोनीमुळे दुर्लक्ष होत असल्याने वाळू तस्करी बेसुमार सुरू आहेत.या वाळू तस्करांना काही मंडल अधिकारी, तलाठ्याकडून मदत केली जात आहे.काही अधिकारी,तलाठीच या गुंतल्याचे आरोप होत आहेत.
पेरलेले बियाणे उगवलेच नाही | नुकसान भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी |
नोंदीचा दर लाखात
जत तालुक्यातील अनेक तलाठी मंडल अधिकाऱ्यांकडून लुट होत आहेच.मात्र त्यात भर म्हणजे जमीन,खरेदी/विक्रीचा नोंदीचा बाजार एकदम तेजीत सुरू आहे.नोंदीसाठी दर पन्नास हजार ते लाखापर्यत असल्याची चर्चा आहे.पैसे न देणाऱ्यांची नोंदी रखडून ठेवल्या जात असल्याचे आरोप होत आहेत.