सत्तेकडे उड्या मारणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदाचे वेध

0

जत,प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीत तत्कालीन सत्ताधारी पक्षात उड्या मारून, पुन्हा सत्ता येताच राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आलेल्या काही नेत्यांना राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदाचे वेध लागल्याची चर्चा आहे. Rate Card

पेरलेले बियाणे उगवलेच नाही | नुकसान भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी |

जत तालुका म्हणजे राजकारणातील सोंगट्या ठरल्या आहेत.अनेकवेळा जिल्ह्यातील नेत्यांनी एक-दोन सोंगट्या उचलून सत्तेचा मार्ग सुकर केला आहे.आताही सत्ता असणाऱ्या पक्षात उड्या मारण्याचे करेक्ट कार्यक्रम काही नेत्यांकडून होत आहेत.तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकारी निवडीची जोरदार चर्चा आहे.या निवडीसाठी आम्ही जणू राष्ट्रवादीचे तारणहार आहोत,म्हणत विधानसभेला सत्ता असणाऱ्या कळपात उडी मारलेल्या काही नेत्यांना राष्ट्रवादीचे आम्ही जूने नेते आहोत असा साक्षात्कार झाल्याचे चित्र आहे.
गिरगांवच्या महिला सरपंचास मारहाण | चार जणाविरूध गुन्हा दाखल |

अनेक पक्षाच्या व्यासपीठावर प्रवेश केलेल्या काही नेत्यांना राज्यातील सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाचे वेध लागल्याची चर्चा आहे.सत्तेकडे उड्या मारणाऱ्या नेत्यामुळे राष्ट्रवादीचा तालुक्यातील मोठा जनाधार विस्कळीत झाल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे.कर्नाटकातून जतला पाणी देण्यासंदर्भात दोन्ही राज्ये सकात्मक ; ना.जयंत पाटील |

आतातरी वरिष्ठ नेत्याकडून पुन्हा राष्ट्रवादीला तालुक्यात गत वैभव आणणाऱ्या नेत्यावर जबाबदारी दिली जाणार का ? पुन्हा नाममात्र प्रभाव आलेल्या स्वंय घोषित नेत्यांच्या गळ्यात माळ घातली जाणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.