जतेत भर पावसात रस्त्याची कामे

0
6

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील अनेक रस्त्याच्या डांबरीकरणाचे रस्ते भर पावसात सुरू आहेत.हा सगळा प्रकार उघड्या डोळ्याने दिसत असूनही बांधकाम विभागाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका घेत आहेत.









तालुक्यात कोरोनामुळे रखडलेले रस्ते घाईगडबडीत तयार करण्याचा घाट जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग 1 व 2 च्या अधिकाऱ्यांनी घातला आहे.अगोदरचं दर्जाहीन रस्ते कामाचा अनुभव असलेल्या या विभागाकडून अनेक रस्ते भर पावसात करून पुर्ण करण्याचे फार्मान ठेकेदारांना काढल्याचे समोर येत आहे.त्यामुळे थेट पाऊस चालू असतानाचा खड्ड्यातील पाण्यातच डांबर टाकून खडीकरण करण्याचा प्रकार समोर येत आहे.त्यात कहर म्हणजे थेट पाऊस पडत असताना फाइनल कारपेट टाकण्याचे उद्योग ही ठेकेदाराकडून या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले आहेत.पावसात रस्त्याची कामे करायची हा साधा नियमही या अधिकाऱ्यांनी पायदळी तुडवला आहे.या कामाची एकाद्याने तक्रार केली तर या कामाचे पैसे 2022 ला येणार आहेत.काम आडविले तर पुन्हा होणार नसल्याचे सांगत या प्रकाराला खतपाणी घालण्याचे उद्योग सुरू आहेत.मात्र हा प्रकार करून किती जणांचा गल्ला भरणार आहे.याबाबत संशोधन करावे लागेल,एवढे निश्चित.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here