नागाव (नि) येथील 40 ब्रासचा वाळू साठा जप्त

तासगाव : तालुक्यातील नागाव (नि) येथील नाथदेव विकास सोसायटीच्या बांधकामासाठी पदाधिकाऱ्यांनीच येरळा नदीतून बेकायदा वाळूचा उपसा केला होता. या वाळूचा पंचनामा होऊनही राजकीय दबावामुळे ती जप्त करण्यात आली नव्हती.
पेरलेले बियाणे उगवलेच नाही | नुकसान भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी |
नागाव (नि) येथील नाथदेव विकास सोसायटीच्या नूतन इमारतीचे काम सुरू करण्यात येत आहे. या कामातील वाळूच्या पैशावर डल्ला मारण्याच्या इराद्याने काही पदाधिकाऱ्यांनी येरळेतून काळ्या सोन्याtची लूट केली. महसुलाच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अंधाऱ्या रात्रीत हे काळे कृत्य केले.