गिरगांवच्या महिला सरपंचास मारहाण | चार जणाविरूध गुन्हा दाखल

0

AM News | तरूणाला नग्न करून मारहाण ...

तिकोंडी,वार्ताहर : गिरगांव ता.जत येथील महिला सरपंच व त्यांच्या मुलगा व सुनेस विनयभंग करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी गिरगांव येथील मारुती मंदिरा समोर घडली आहे.महिला सरपंच यांचा मुलगा लक्ष्मण सायप्पा मांग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Rate Card


पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,लक्ष्मण मांग यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  शनिवारी 11 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता मांग गल्लीतील सभा मंडपात गोंधळ करू नका असे काही जणांना सांगितले होते. याचा राग मनात धरून चंदाप्पा मांग,सचिन मांग,हाजाप्पा मांग, शरणापा मांग यांनी ग्रा.प.सदस्य बसवराज कासिराम पाटील यांच्या मार्फत बोलावून घेऊन लक्ष्मण,व महिला सरपंच,सून यांना विनयभंग करत लाथा- बुक्यांनी मारहाण जखमी केले आहे. पुढील तपास पोलीस फौजदार सचिन आटपाडकर करत आहेत.एखाद्या मागासवर्गीय महिला सरपंचांच्या कुटुंबावर मारहाण करणे हे निंदनीय आहे.याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सरपंच परिषद,जत तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.