जतेत रोगराईला रोका,अन्यथा आंदोलन | बहुजन समाज पार्टीचा इशारा
जत,प्रतिनिधी : कोरोनाचा वाढलेला प्रभाव, सततचा पाऊस व सांडपाणी साठल्याने शहरामध्ये रोगराई पसरली असून नगरपरिषदेने तातडीने औषध फवारणी करावी,अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.तसे निवेदन प्रांताधिकारी,तहसीलदार,मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, भारतामध्ये कोरोनाने थैमान घातले असून महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे.तसेच जत तालुक्यामध्येही कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे.सद्या पावसाचे दिवस असून जत शहरामध्ये पाऊस होऊन ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच साचलेल्या पाण्यामध्ये व घाणीमध्ये डासांची पैदास होऊन चिकनगुनिया, डेंगू, हिवताप, मलेरिया व इतर साथीचे आजार पसरण्याचा धोका आहेतरी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्या औषध फवारणी करावी.नगरपरिषदे कडून साथीचे आजार पसरु नयेत तसेच स्वच्छतेच्या बाबतीत ठोस व तत्परतेने उपाय योजना न केलेस प्रांतकार्यालय, जत येथे दि. 20/07/2020 रोजी उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष तानाजी व्हनखंडे, जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, प्रभारी महादेव कांबळे, महासचिव शरद शिवशरण, प्रभारी पप्पू तोरणे, सेक्टर अध्यक्ष गौतम सर्जे, शहर अध्यक्ष सुनिल क्यातन,शहर महासचिव दिपक कांबळे, गजानन ऐवळे, महेश कांबळे इ.उपस्थित होते.
जत शहरात रोगराई पसरण्या आधी औषध फवारावेत या मागणीचे निवेदन देण्यात आले.