सावकारी डंख पुन्हा बळावला | सिंघम अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर सावकार सक्रीय : गरजूची पिळवणूक

0



जत,प्रतिनिधी : जत शहरासह ग्रामीण भागातील बेकायदा सावकारांचा धुमाकूळ सिंघम फेम पोलिस निरिक्षक रामदास शेळके यांच्यामुळे डंख थांबला होता.मात्र पो.नि.शेळकेची बदली होताच पुन्हा बेकायदा सावकारांनी डोके वर काढले असून अव्वाच्या सव्वा व्याज आकारून गरजूची पिळवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत.अशा सावकारांना पाठीशी घालणारे पोलीस दलातील झारीतरी शुक्राचार्य सक्रीय झाले आहेत.जत शहरासह तालुकाभर पैशासाठी नडलेल्या गरजूंना हेरून त्यांना पैशाचा पुरवठा करत त्यांना 10 ते 25 टक्क्यापर्यत व्याज आकारून शेतजमिनी, प्लॉट, प्लॅट, घर अशा मालमत्ता हडप करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले होते.






जतमधील दडपलेल्या पाच मृत्यूप्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करा ; विक्रम ढोणे |


असे प्रकार वाढत असताना दुसरीकडे पोलिस मात्र कारवाईस टाळाटाळ केली जात होती.पोलिसांचीच साथ या सावकारांना असल्याने सावकारी फोफावत चालली होती.अनेकांना गुन्हेगाऱ्यांच्या मदतीने कर्ज देणाऱ्यांना उचलून आणून जमीन,प्लॉट बळकाविण्याचे प्रकार शहरातील सावकाराकडून बेधडक होत होते.या सावकारीतून अनेक गुन्हेगार तयार झाले होते.सावकारांची ही दहशत सिंघम स्टाईलने जत पोलिस ठाण्याचा पदभार घेतलेल्या पो.नि.रामदास शेळके यांनी मोडून काढण्याचे शिवधनुष्य उचलले होते.गेल्या सहा महिन्यात त्यांनी शहरासह तालुक्यातील सावकारीसह त्यांच्या पाठिशी असणाऱ्या आकांना चांगलीस चपराक दिली होती.त्यांच्या कारवाईच्या दणक्याने सावकार भूमिगत झाले होते.मात्र पो.नि.शेळकेची बदली होऊन दुसऱ्या आठवड्यातच या सावकारांनी डंक बाहेर काढला असून वसूलीसाठी धमकाविण्याचे प्रकार पुन्हा समोर येत आहेत.





Rate Card



जतच्या रस्त्याला ठेकेदाराची किड | निकृष्ठ कामे करून कोट्यावधीचा निधीवर डल्ला : सर्व विभागात लुटारूच्या टोळ्या |


घेतलेले संपुर्ण पैसे व्याजासहित देऊनही पुन्हा हे सावकार दहशत करत लोकांना लुटत असल्याचे पुन्हा समोर येत आहे.मुलांची लग्ने, कार्यक्रम, शिक्षण, रुग्णालयाचा खर्च, निवडणुका यासह अनेक कारणांसाठी या सावकारांकडून कर्जे घेतली जातात. परतफेड केली नाही तर त्यांच्या मालमत्ता हडप केल्या जातात. वास्तविक परवाना असणार्‍यांनीच कायद्या प्रमाणे कर्ज द्यावे. मात्र परवाना नसणारे बेकायदा सावकार कर्ज देतात. सावकार महिन्याला 10 टक्क्यांपासून 25 टक्क्यांपर्यंत व्याज घेतात. 






जत तालुक्यात हरित क्रांती आणण्याचे स्वर्गीय राजारामबापूचे स्वप्न साकार होणार : अँड.चन्नाप्पा होर्तीकर |


काही सावकारांचे व्याज घेण्याचा कालावधी हा दररोज, आठवड्याला तर काहींचा पंधरा दिवसांचा आहे. जर हे व्याज मिळाले नाही तर त्या व्याजावरही चक्रवाढ व्याज घेतात. त्यामुळे मुद्दलाच्या कितीतरी पटीने व्याज घेतले जाते. या सावकारांची या कर्जाच्या वसुलीसाठी तशी तगडी यंत्रणाही सक्रीय झाले आहेत.नव्याने आलेले प्रशिक्षणार्थी डिवायएसपी डॉ.निलेश पालवे या सावकारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा विशेष मोहिम उघडण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.