जतच्या रस्त्याला ठेकेदाराची किड | निकृष्ठ कामे करून कोट्यावधीचा निधीवर डल्ला : सर्व विभागात लुटारूच्या टोळ्या

0

जत,प्रतिनिधी : जत शहरातील रस्त्यांना ठेकेदारांची किड लागली आहे.

रस्त्याच्या दुरूस्तीनंतर पुन्हा खड्डे पडण्याने शासनाच्या कोट्यावधीचा निधीवर डल्ला मारण्याचे पाप ठेकेदाराच्या काही टोळ्या करत आहेत.यामुळे नागरिकांच्या विकासाचे तीनतेरा वाजविले आहे.जत तालुक्यासह शहरात शासनाकडून कोट्यावधीचा निधी आला आहे. मात्र या निधीवर डल्ला मारणारी टोळीच नगरपरिषद व तालुक्यात तयार झाली आहे.

Rate Card




जतचा दुष्काळ ना.जयंत पाटीलच संपविणार ; उत्तम चव्हाण

या टोळीला विकास योजनाच्या निधीची माहिती लागताच त्या निधीची कशी विल्हेवाट लावायची,कोणाला ठेका द्यायचा,जादा पैसे कसे मिळविण्याचे, कोणते कामे बसवायची यांची चांगली कुंडलीच या ठेकेदाराकडून बनविण्यात येते.मग तेथून पुढे सुरू होतो,डल्ला मारण्याचा कारभार,अनेक वेळा भष्ट कामाचे आरोप झालेल्या ठेकेदारांना काम दिली जातात.












कुपवाडमधील खून प्रकरणाचा छडा | जत तालुक्यातील जिरग्याळ येथून घेतले पाच संशयितांना ताब्यात |


त्यातून कमिशन, नियमबाह्य दर्जाहिन,व निकृष्ट कामे जनतेवर लादण्याचा प्रकार अनेक वर्षे बिनबोभाटपणे सुरू आहे.केलेली कामे काही महिन्यात जैसेथे होतात.रस्त्याची तर एक दोन महिन्यात वाट लागते.मात्र हे करताना कोट्यावधीचा निधी फस्त होतो.आणि पुन्हा नव्या योजना व नव्या निधीचा शोध सुरू केला जातो.

अशाच पध्दतीने गेल्या अनेक वर्षापासून असाच प्रकार राजरोसपणे सुरू आहे.याला वरिष्ठ नेते,अधिकारी यांचा छुपा वरदहस्त तालुक्यासह शहराची वाट लावत आहेत.या सर्व प्रकाराला रोकण्यासाठी नव्या विचार,नवे लोकहिताची संघटना तयार होण्याची गरज आहे.




जतला खड्ड्यात कोणी ढकलले ? | शहरभर रस्त्यांना गटारी,डबक्याचे स्वरूप : अनेक नवे रस्ते दबले |



जतला भ्रष्ठ ठेकेदारांनी लुटले


जत शहरासह तालुक्यातील काही भ्रष्ठ ठेकेदारांनी लोकप्रतिनिधीच्या टोळीच्या मदतीने निकृष्ट कामे करून डोळ्यादेखत लुटले आहे.निकृष्ट कामाच्या तक्रारी करूनही पुन्हा त्याच ठेकेदारांना कामे देण्यामागचे गौडबंगाल काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.