डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा | जतेत रिपाइचे निवेदन

0
2

जत,प्रतिनिधी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यगृह बंगल्यावर हल्ला करणाऱ्या समाज कंटाकावर्ती कडक कारवाई करावी अशी मागणी रिपाइच्या वतीने करण्यात आली.तसे निवेदन अप्पर तहसीलदार,उमदीचे पोलिस निरिक्षक दत्तात्रय कोळेकर यांना देण्यात आले.

जत तालुका विधानसभा अध्यक्ष राकेश कांबळे,जत तालुकाध्यक्ष श्रीकांत हुवाळे,सांगली जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर,जत तालूका सरचिटणीस बिरूदेव बाबर उपस्थित होते.

मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर अज्ञात हल्लेखोरोंनी हल्ला करत मोडतोड केली आहे.त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी,अशी मागणी निवेदनात केली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here