गावातील नेतृत्व बदल रखडले | सदस्यातून संरपच निवडणूका झाल्यास अनेक गावात खांदेपालट निश्चित
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 81 गावातील निवडणूका होऊन अडीच वर्षाचा कालावधी संपला आहे.अनेक गावात या निवडणूका होताना खांदेपालटाची आश्वासने गट नेत्याकडून अनेक इच्छुक उमेदवारांना देण्यात आली होती.त्यामुळे अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
जतचा दुष्काळ ना.जयंत पाटीलच संपविणार ; उत्तम चव्हाण
कोरोनाचा चार महिन्यात थंड असलेले जत तालुक्यातील अनेक गावातील राजकारण पुन्हा गरम होतानाचे चित्र आहे.

थेट निवडणूक की सदस्यातून संभ्रम कायम
थेट संरपच निवड की सदस्यातून निवडणूका यांचा संभ्रम कायम आहे.नव्या सरकारने थेट संरपच निवडणूका रद्द केल्या आहेत.तो नियम लावला जाणार का गतवेळीप्रमाणे थेट निवडणूक होणार याबाबत गावागावात चर्चेचे खल रंगत आहेत.सदस्यातून संरपच निवडणूका झाल्यातर अनेक गावात खांदेपालट निश्चित आहे.