सांगली : कुपवाड येथील राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांच्या रोहिणी कोल्ड स्टोअरेज मधील खूनाचा 24 तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून उलगडा केला.याप्रकरणी निलेश विठोबा गडदे,(वय-21,रा.वाघमोडेनगर कुपवाड), सचिन अज्ञान चव्हाण (वय-22,रा.आर पी पाटील,शाळेजवळ कुपवाड),वैभव विष्णु शेजाळ (वय-21 रा.विठुरायाचीवाडी ता.कवठेमहकाळ संध्या रा, वाघमोडेनगर कुपवाड), मृत्युजंय नारायण पाटोळे (वय-27 रा.आंबा चौक यशवंतनगर ता.मिरज), किरण शंकर लोखंडे (वय-19 रा.वाघमोडेनगर कुपवाड)असे अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहे.जिरग्याळ ता.जत येथील वनविभागाच्या हद्दीतून त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा ;
जतला कोणी ढकलेले खड्ड्यात | सर्वच रस्ते पाणीमय
कुपवाड येथील राजकीय पदाधिकारी दत्तात्रय महादेव पाटोळे रा.वाघमोडेनगर कुपवाड यांचा काल दिनांक 10 रोजी, सकाळी अज्ञात इसमानी संगनमत करुन गाडी आडवी मारून,पाटलाग करून त्याचे डोकीत, शरीरावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खून करण्यात आला होता.या घटनेच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा,अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुल यांनी भेट देवून या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.
एका क्लिकवर वाचा आजचा दैनिक संकेत टाइम्स
पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी या गुन्ह्यातील आरोपीच्या शोध कामी दोन वेगवेगळी पथके तयार केले,त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली कडील पथकाने गुन्ह्याचे ठिकाणी भेट देवुन, सदर मयताचे वाघमोडे नगर, मधील मित्र, नातेवाईक, पाहुणे यांचे कडे खुनाचे कारणा विषयी माहीती घेत असताना,पथकातील पो.ना.सागर लवटे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मयत दत्तात्रय पाटोळे यांचा काही दिवसापुर्वी किरकोळ कारणावरुन निलेश गडदे यांचेत वाद झाला होता.याचा राग मनात धरुन निलेश गडदे व त्याचे मित्र यांनी मिळून हा खुन केला असल्याचे समजले.हे संशयित आरोपी हे जिरग्याळ ता.जय येथील कुरणात असल्याचे माहीती मिळाली. मिळाले माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांचे पथकाने छापा मारुन त्यांना ताब्यात घेतले.
हेही वाचा;
कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर पाणी योजनेचा श्रेय वाद रंगणार
त्यांच्याकडे रोहिणी कोल्ड स्टोअरेज मध्ये झालेल्या दत्तात्रय पाटोळे यांच्या खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने निलेश गडदे याचे कडे चौकशी केली असता,त्यांने जून्या भांडणाचा राग मनात धरुन मित्रांसोबत त्याचा खून केला असल्याची कबूली पोलिस पथकाला दिली आहे.त्यांना अटक करून पुढील तपासासाठी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि/ प्रविण
शिंदे, प्रदीप चौधरी, अभिजीत सावंत, अंतम खाडे, शरद माळी सपोफौ सागर पाटील,जगन्नाथ पवार, बिरोबा नरळे,सागर लवटे, निलेश कदम, जितेद्र जाधव, मेघराज रुपनर,अरुण औताडे,अमित परिट, सुधीर गोरे, संदिप गुरव,अनिल कोळेकर, शशिकांत जाधव, सुनिल लोखंडे,मुदतसर पाथरवट,आमसिध्दा खोत,राजू शिरोळकर,राजू मुळे.संजय पाटील, सचिन कणप, वैभव पाटील, विकास भोसले, संजय कांबळे, सुहेल कार्तीयांनी, अजय बेंद्रे, सचिन सुर्यवंशी, अरुण सोकटे, स्वप्नील नायकोडे,सुवर्णा देसाई. प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर,ऋषीकेश सदामते, गौतम कांबळे यांनी सहभाग घेतला.