जत तालुक्यात आरोग्य विभागाची 103 पदे रिक्त

0

जत,(प्रतिनिधी): जत तालुक्यात ग्रामीण रुग्णालय व आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात 103 पदे रिक्त आहेत.तातडीने वैद्यकीय अधिकारी व इतर आरोग्य कर्मचारी या रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी जतचे आमदार विक्रम सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Rate Card

सध्या देशभर कोरोना (कोव्हीड 19)या संसर्गजन्य आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून जत तालुक्यामध्ये 2 ग्रामीण रुग्णालय व 8 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत .सध्या याठिकाणी डॉक्टर व आरोग्यसेवक यांची पदे रिक्त असल्याने सेवा विस्कळीत झाली आहे.सध्या कोरोना व्हायरसने देशभरात व महाराष्ट्रात थैमान घातला आहे. त्यातच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. जत तालुक्यातील बहुतांशी उसतोड कामगार इस्लामपूर, कडेगाव, सांगली, वाळवा, कुंडल व अन्य कारखान्यास उसतोडीसाठी गेलेले आहेत. ते कोरोनाच्या भीतीने परत जत तालुक्यात आले असून त्यांची तपासणी करण्यासाठी व उपचार करण्यासाठी डॉक्टरांची व आरोग्य सेवकांची संख्या अगदी तुटपुंजी असून कोरोनाचा पुढील धोका टाळण्यासाठी जत तालुक्याला खास बाब म्हणून डॉक्टर व रुग्णसेवक तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.