कर्नाटकतील तुबची-बबलेश्वर पाणी योजनेचा श्रेयवाद रंगणार
जत,प्रतिनिधी : गेल्या अनेक तपापासून जत पुर्व भागातील 65 गावे सिंचन योजनेसह पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.या पाण्याच्या मुद्यावर अनेक नेत्यांनी पदाच्या खुर्च्या उबवल्या आहेत.
गेल्या दहा वर्षापासून या भागाला कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर पाणी योजनेतून नैसर्गिक उताराने पुर्व भागातील गावांना पाणी येऊ शकते.कर्नाटक, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय करार करून पाणी द्यावे,असे वस्तूनिष्ठ
भूमिका मांडत आमदार विक्रमसिंह सांवत दोन्ही सरकारकडे पाठपुरावा करत आहे.आमदारकी निवडणूकी आधी त्यांनी पुर्व भागात हाच मुद्या उचलून धरला होता.तर भाजपकडून म्हैसाळ विस्तारित योजनेतून या भागात पाणी आणू असे आश्वासन दिले होते.निवडणूकीनंतर आमदार झालेले सावंत यांनी पुर्व भागात कर्नाटकातून पाणी सोडा असाच मुद्दा सरकारकडे लावून धरला आहे.दरम्यान सांगली,कोल्हापूर पुराच्या पाण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्यातील जलसंपदा मंञी,वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली आहे.त्यात पुराचे जादा पाणी या अनुषंगाने चर्चा झाली आहे.कर्नाटकच्या तुबची-बबलेश्वर योजनेतून जत दोन टिएमसी पाणी देण्याबाबत दोन्ही राज्यात एकमत झाले आहे.यानिमित्ताने प्रत्येक निवडणूकीत चर्चेतला पुर्व भागाचा पाणीप्रश्न
सुटण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीत श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत.नुकतेच राष्ट्रवादीचे युवा तालुकाध्यक्षा उत्तम चव्हाण यांनी जत तालुक्याचा पाणी प्रश्न ना.जयंत पाटीलच सोडवतील असे पत्रकार बैठकीत ठासून सांगितले आहे.यावर या योजनेसाठी गेल्या 10 वर्षापासून संघर्ष करणारे आ.विक्रमसिंह सांवत काय प्रतिक्रिया देणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
